“बिहार निवडणुकीत हुंड्यात मत द्या अन् महागठबंधनला जिंकवा”; समाजवादी पक्षाच्या खासदाराचे विधान

Sanatan Pandey | समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील बलिया लोकसभेचे खासदार सनातन पांडे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. “बिहार उत्तर प्रदेशसाठी खास आहे. बिहारमधील छपरा, आरा आणि सिवान सारखे जिल्हे नसते तर उत्तर प्रदेशमधील अर्ध्याहून अधिक मुले बिनलग्नाची राहिली असती. बिहारच्या निवडणुकीत या लोकांनी हुंड्यात मतदान द्या, असे ते म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील जुन्या सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधाचा हवाला देत उत्तर प्रदेशच्या सीमेवर राहणाऱ्या मतदारांनी महागठबंधनला मतदान करावे. आमचे बिहारशी रोटी-बेटीचे संबंध आहेत. बिहारींशी आमची सोयरीक असल्यामुळे बलियाचे आम्ही लोक हुंड्यात मत मागत आहोत. हुंडा म्हणून आम्हाला तुमचे मत द्या आणि राज्यात महागठबंधनचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करा, असे आवाहन पांडे यांनी केले.
बिहारला गुन्हेगारीमुक्त करणार
समाजवादी पक्षाचे नेते पुढे म्हणाले, “बिहारमधील भाजपाचे कार्यकर्ते, नेते त्यांच्या त्यांच्या पक्षात राहूनही आपल्या जुन्या संबंधांना जागून तेही महागठबंधनला मतदान करू शकतात. मी जर छपरा येथे गेलो तर तर तिथले प्रख्यात वकील अवधेश सिंह जे भाजपाचे सदस्य आहेत. ते मला भाजपाच येण्याचे आवाहन करतात. मी त्यांना हुंड्यात महागठबंधनला मतदान देण्याची विनंती करेन. खासदाराचा मुलगा खासदारच होईल असे काही आवश्यक नाही. आम्ही गुन्हेगारीने ग्रस्त बिहारला गुन्हेगारीमुक्त करणार आहोत,” असे आश्वासन देखील त्यांनी दिले. Sanatan Pandey |
याशिवाय सनातन पांडे यांनी तेजस्वी यादव यांचेही तोंडभरून कौतुक केले. “तेजस्वी यादव यांनी पाच लाख लोकांना रोजगार दिला. यामुळे यूपीतील वाराणसी, बलिया, चंदौली यासारख्या जिल्ह्यातील तरूणांना मोठा लाभ मिळाला. उत्तर प्रदेशमधील तरूण जर बिहारच्या बूथवर असतील तर तेही तेजस्वी यादव यांनाच मतदान करतील”, असेही सनातन पांडे म्हणाले. Sanatan Pandey |
दोन टप्प्यात मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल
दरम्यान, बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यात 121 जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यात 122 जागांवर मतदान होईल. 14 नोव्हेंबरला बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. यावरून जनता पुढील पाच वर्षांसाठी राज्याची जबाबदारी कोणाला देणार हे स्पष्ट होईल. Sanatan Pandey |
हेही वाचा:





