Volodymyr Zelenskyy : युद्धबंदीच्या वाटाघाटी रखडल्यामुळे युक्रेनने व्यक्त केली चिंता
रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी रखडल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Volodymyr Zelenskyy : रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटी रखडल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीमध्ये होणाऱ्या त्रिस्तरिय चर्चेसाठी आपण तयार आहोत. मात्र ही चर्चा कधी होईल हे अमेरिका आणि रशियावर अवलंबून आहे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
या त्रिस्तरिय बैठकीचे आयोजन अमेरिकेत व्हावे, असा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे. मात्र या चर्चेसाठी आपले प्रतिनिधी अमेरिकेत पाठवण्यासाठी रशियाने नकार दिला आहे. रशियाच्या नकारामुळे आता एकतर चर्चेचे ठिकाण अमेरिकेकडून बदलले जावे किंवा या चर्चेला प्रतिनिधी पाठवण्याचे रशियाने मान्य करायला हवे, असेही झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या कोणत्याही वाटाघाटींना आम्ही अटकाव करणार नाही. ही त्रिस्तरिय बैठक व्हावी, असेच आम्हालाही वाटते असेही त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियात उद्भवलेल्या युद्धामुळे अमेरिकेने दोनवेळा दोन्ही बाजूंमधील चर्चा दोनवेळा पुढे ढकलली आहे. अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर सुरू झालेले इराणचे युद्ध आता संपूर्ण आखातामध्ये पसरले आहे.
यामुळे जगाचे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडून इराणच्या युद्धाकडे केंद्रित झाले आहे. पण यामुळे रशियाच्या लष्कराला थोपवून धरणे युक्रेनसाठी आणखी अवघड बनले आहे. रशियाकडून जवळपास दररोजच युक्रेनवर केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माऱ्याला तोंड देणे युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीला अवघड झाले आहे, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.
फ्रान्सच्या मदतीची हमी
युक्रेनच्या स्थितीविषयी पॅरिस येथे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्याशी आपली चर्चा झाली अमेरिकेच्या बनावटीच्या पेट्रिएट हवाई संरक्षण प्रणालीऐवजी प्रान्सची स्टॅम्प-टी सिस्टीम वापरण्याचा पर्याय त्यातून पुढे आला आहे. हा नवीन पर्याय वापरून त्याची उपयुक्तता तपासणारा युक्रेन हा पहिला देश असेल, असेही झेलेन्स्की यांनी सांनी सांगितले.
युक्रेनने अमेरिकेला गेल्या वर्षी ५० अब्ज डॉलरच्या संरक्षण सहकार्य कराराचा प्रस्ताव दिला होता. याअंतर्ग अमेरिकेला ड्रोन तंत्रज्ञान दिले जाणार होते. अमेरिकेनेच युक्रेनकडे ड्रोन तंत्रज्ञान मागितले होते. मात्र आता अमेरिकेला आता युक्रेनच्या ड्रोन तंत्रज्ञानाची गरज नाही, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले असल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले.






