फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी आली ‘या’ कंपनीची शानदार SUV, किंमत 49 लाख; पाहा डिटेल्स

Volkswagen Tiguan R-Line Details | जर्मनीची प्रतिष्ठित कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी एसयूव्ही Tiguan R-Line अधिकृतपणे लाँच केली आहे. या दमदार एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ₹48.99 लाखांपासून सुरू होते. स्टायलिश डिझाइन, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि जबरदस्त परफॉर्मन्स यामुळे ही गाडी चर्चेत आहे. Volkswagen Tiguan R-Line कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.
इंजिन आणि परफॉर्मन्सची
Volkswagen Tiguan R-Line मध्ये 2.0 लिटर TSI EVO पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 7-स्पीड DSG ट्रान्समिशनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 204 PS पॉवर आणि 320 Nm टॉर्क तयार करतं. 4 मोशन ऑल-व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञान आणि डायनॅमिक चेसिस कंट्रोल (DCC प्रो) मुळे प्रत्येक प्रकारच्या रस्त्यांवर उत्तम पकड मिळते.
या एसयूव्हीमध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 15.1 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. अॅडव्हान्स अॅडॉप्टिव्ह सस्पेंशन सिस्टीम, “एर्गो अॅक्टिव्ह” मसाज सीट्स, 3-झोन एअर कंडिशनिंग, पार्क असिस्ट प्लस आणि ड्युअल स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग यांसारख्या सुविधा ही एसयूव्ही आणखी आकर्षक बनवतात.
केबिनमध्ये R-बॅजिंग, 30 रंगांची एम्बिएंट लाइटिंग, आणि मल्टी-फंक्शन ड्रायव्हिंग प्रोफाइलचेही समावेश आहे.
सुरक्षेसाठी मिळतील अनेक फीचर्स
Volkswagen Tiguan R-Line मध्ये 21 प्रकारची लेव्हल-2 ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम) फीचर्स आणि 9 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि चारही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. युरोपियन NCAP क्रॅश टेस्टमध्ये या वाहनाला 5-स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त झाली आहे.
बुकिंग सुरू, डिलिव्हरी लवकरच
Tiguan R-Line ची बुकिंग सध्या सुरू असून, 23 एप्रिल 2025 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे. एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ₹48.99 लाखांपासून सुरू होते. भारतीय बाजारात या एसयूव्हीची थेट टक्कर टोयोटा फॉर्च्युनर यासारख्या प्रीमियम गाड्यांशी होणार आहे.




