नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार आहे? ‘या’ कारवर तब्बल 1.70 लाखांची सूट, सुरक्षेसाठी मिळतात शानदार फीचर्स

Volkswagen Virtus Offer: भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कार प्रचंड लोकप्रिय आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून देखील या कार्सवर विशेष ऑफर दिली जाते. तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगन लोकप्रिय सेडान वर्टसवर (Volkswagen Virtus) बंपर डिस्काउंट देत आहे. या कारच्या खरेदीवर तुम्ही 1.70 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Volkswagen Virtus ची किंमत आणि ऑफर
तुम्हाला Volkswagen Virtus 2024 मॉडेलवर 1.50 लाख रुपये 1.70 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. तर Volkswagen Virtus 2025 च्या खरेदीवरवर 80 हजार रुपयांपर्यंतची बचत होईल. प्रत्येक डीलरशीपनुसार ऑफर वेगवेगळी असू शकते. या सेडान कारची किंमत 11.50 लाख रुपयांपासून ते 19.39 रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. त्यामुळे डिस्काउंटसह या कारला कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Volkswagen Virtus चे स्पेसिफिकेशन्स
Volkswagen Virtus मध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले असून, हे 115bhp पॉवर आणि 178Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याशिवाय, कारमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचाही पर्याय मिळतो. हे 150bhp पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
या कारमध्ये 5 जण सहज बसू शकतात. याची बूट स्पेस 521 लीटर आहे. यामध्ये सुरक्षेसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक आणि 6 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. तसेच, 10.09 इंच टचस्क्रीन देण्यात आली असून, यामध्ये अनेक फीचर्स मिळतात.





