व्होडाफोनच्या शेअरची गळती चालूच
Updated On:

मुंबई – बऱ्याच कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर गेल्या काही दिवसापासून घसरत आहेत. आजही या कंपनीच्या शेअरचा भाव एक वेळ 24 टक्क्यांनी कमी झाला होता. नंतर त्यात बरीच सुधारणा झाली.
कालच व्होडाफोन आयडियाच्या अध्यक्षपदाचा कुमार मंगलम बिर्ला यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये दूरसंचार क्षेत्रांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांमध्ये बऱ्याच कंपन्यांचा अस्त झाला आहे.
या क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांनी सरकारकडे वेळोवेळी मदतीची मागणी केलेली आहे. मात्र सरकारने आतापर्यंत तरी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता दूरसंचार क्षेत्रांमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल या दोन मोठ्या कंपन्या शिल्लक राहिल्या आहेत.





