युक्रेनसोबतच्या युद्धावर व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा ; म्हणाले,”युक्रेनशी तडजोड करण्यास…”

Vladimir Putin । रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबतच्या युद्धावर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी याविषयावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेन युद्धाबाबत तडजोड करण्याबाबत निर्णय घेतला. युक्रेनसोबतच्या युद्धावर आपण तडजोड करण्यास तयार असल्याचे म्हटले. त्यासोबत त्यांनी चर्चेसाठी आपल्या कोणत्याही पूर्व अटी नाहीत परंतु कोणत्याही करारामध्ये कायदेशीर युक्रेनियन अधिकारी समाविष्ट असले पाहिजेत” अशी मागणी केली.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले की, “रशिया राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहे. पुतिन यांनी एका अमेरिकन वृत्तवाहिनी बोलताना, मी ट्रम्प यांच्याशी अनेक वर्षे बोललो नाही, परंतु या संघर्षावर चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी आपण भेटण्यास तयार आहोत.
तात्पुरत्या युद्धबंदीवर पुतिन काय म्हणाले? Vladimir Putin ।
रशिया कमकुवत स्थितीत असल्याचा दावा पुतिन यांनी फेटाळला. ते म्हणाले की 2022 मध्ये युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर देश अधिक मजबूत झाला आहे.त्यासोबतच रशिया वाटाघाटी करण्यास तयार आहे, परंतु कीवनेही तडजोड करण्यास तयार असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. पुतिन यांनी कायमस्वरूपी शांतता कराराच्या बाजूने तात्पुरत्या युद्धविरामाची कोणतीही शक्यता नाकारली.
ओरेश्निक हायपरसॉनिक मिसाईलबद्दलही बोललो Vladimir Putin ।
माध्यमांशी बोलताना पुतिन यांनी ओरेश्निक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राबद्दलही बोलले, जे रशियाने युक्रेनच्या लष्करी कारखान्यावर आधीच वापरले आहे. ते म्हणाले की ते युक्रेनमध्ये आणखी एक प्रक्षेपण करण्यास तयार आहे आणि पाश्चात्य हवाई संरक्षण यंत्रणा ते खाली पाडू शकते का ते पाहण्यास तयार आहे. दरम्यान, त्यावेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ब्रुसेल्समधील युरोपियन कौन्सिलच्या बैठकीत पत्रकार परिषदेत पुतीन यांच्या क्षेपणास्त्र वापराबाबत चर्चा केली आणि विचारले, “तुम्हाला वाटते की तो एक विवेकी व्यक्ती आहे का?”त्यामुळे आता या युद्धावर नेमका तोडगा काय निघत हे पाहणे गरजेचे आहे.
हेही वाचा
Melbourne Test : आघाडीच्या फळीचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय – इयान हिली





