Vivek Oberoi: विवेक ओबेरॉयने केले सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचे कौतुक
विवेक गेली बरीच वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी कार्यरत

Vivek Oberoi: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉयच्या यांच्यातील वादाची बरीच चर्चा होती. मात्र अनेक वर्ष असलेला त्यांचा वाद आता संपला आहे. नुकतेच ओबेरॉयने सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
शनिवार, 28 नोव्हेंबर 2026 रोजी विवेक ओबेरॉयने कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘रामायण’ या चित्रपटाच्या एका विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याला सलमान खानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाबद्दल विचारले असता, त्याने त्याचे कौतुक केले.
तो म्हणाला की, भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमावर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं पाहिजे. तसेच, त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांना शुभेच्छाही दिल्या. कोणताही सिनेमा, जो भारतीय सैन्याचं शौर्य, पराक्रम, धाडस यावर आधारित असतो, त्यावेळी प्रेक्षक म्हणून आपण अशा सिनेमांना पाठिंबा द्यायला हवा, असं माझं मत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळायला हवं.”
चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा उल्लेख आपला मित्र असा करत, विवेकने त्याला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, “माझा मित्र अपूर्व लाखिया याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी मी त्याच्यासोबत ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटात काम केले होते. या प्रोजेक्टसाठीही मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मला आशा आहे की हा चित्रपट यशस्वी होईल आणि प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
दरम्यान, सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला मातृभूमी : मे वॉर रेस्ट इन पीस हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर, विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला मिस्टर अँड मिसेस ग्रे हा सिनेमा ११ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सलमानच्या चित्रपटाबद्दल विवेक ओबेरॉय काय म्हणाला?
सलमान खानच्या ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाबाबत बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, भारतीय लष्कराच्या धैर्यावर आणि पराक्रमावर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळायला हवा. “माझ्या मते, जेव्हा कधी भारतीय लष्कराच्या शौर्यावर, धैर्यावर आणि पराक्रमावर आधारित एखादा चित्रपट बनवला जातो, तेव्हा प्रेक्षक म्हणून आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. हे चित्रपट भरपूर प्रेमास पात्र असतात.”
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘रामायण’चे विशेष स्क्रीनिंग
विवेक ओबेरॉयने नुकतेच कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘रामायण’ या चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. वैद्यकीय उपचारांच्या कठीण प्रक्रियेतून जात असलेल्या या रुग्णांच्या आयुष्यात थोडा आनंद आणि मनोरंजनाचा विरंगुळा आणणे हा यामागचा उद्देश होता. विवेक गेली बरीच वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी कार्यरत आहे; या स्क्रीनिंगच्या माध्यमातून त्याने या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक झाले.
मध्ये प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याची बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
सलमान आणि विवेक यांच्यातील वाद
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वाद 2003 मध्ये सुरू झाला, विवेकने एक पत्रकार परिषद घेऊन सलमानवर धमकीचे फोन केल्याचा आरोप केला होता. यामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले. हा वाद बराच काळ सिनेविश्वात चर्चेचा विषय राहिला. मात्र, अलीकडेच विवेकने सलमानच्या चित्रपटाला यशासाठी शुभेच्छा दिल्यामुळे, त्यांच्यातील वाद मिटल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा:





