Avneet Kaur: “अत्यंत विचित्र आणि चुकीचे…”, अवनीत कौरचे आयटम साँग पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
यावर अवनीत कौर आणि चित्रपटाच्या टीमने या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Avneet Kaur: अभिनेता इमरान हाशमी आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘गनमास्टर जी9’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इमरान हाशमी आणि जिनिलिया यांची जोडी चाहत्यांना चांगलीच आवडत आहे.
मात्र, या चित्रपटातील अवनीत कौरचं आयटम साँग पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 25 वर्षीय अवनीत कौरचे डान्स स्टेप्स पाहून सोशल मीडिया युजर्सचाही संताप झाला असून, ते या डान्स स्टेप्सवर आक्षेप घेत आहेत.
‘गनमास्टर जी9’ या चित्रपटातील व्हायरल गाणे ‘दिल के थिएटर में 200 करोड़ मारूंगी पिया’ मध्ये अवनीत कौर नाचताना दिसत आहे. युजर्सना या गाण्याची कोरिओग्राफी अजिबात आवडलेली नाही आणि त्यानंतर हे गाणे वादात सापडले आहे. यावर अद्याप अवनीत कौर आणि चित्रपटाच्या टीमने या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एका युजरने ट्वीट करत म्हटले की, “अवनीत कौर फक्त २५ वर्षांची आहे आणि या कशा डान्स स्टेप्स आहेत? अत्यंत विचित्र वाटतं आहे, तिला आयटम नंबर्स करण्यासाठी का भाग पाडलं जात आहे आणि या सगळ्याची गरजच काय होती?”
तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “अवनीत कौरचे नवीन गाणे अत्यंत विचित्र आणि चुकीचे वाटले.” यातील इमरान हाशमीसोबत अवनीत कौरचा डान्स युजर्सना आवडलेला नाही. काही युजर्सनी इमरान हाश्मी आणि अवनीत कौर यांच्यातील वयाच्या अंतरावरूनही टीका केली आहे.
‘पेद्दी’ वरही झाला होता वाद
यापूर्वी राम चरणच्या ‘पेद्दी’ या चित्रपटावरही वाद झाला होता. या चित्रपटात जान्हवी कपूरच्या लूकवर लोकांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटात अभिनेत्रीचा लूक बोल्ड दाखवण्यात आला होता. जेव्हा हा वाद वाढला, तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू साना यांनी युजर्सची माफी मागितली होती आणि जान्हवी कपूरचे सीन्सही एडिट करण्यात आले होते.
हेही वाचा:





