Operation Sindoor Film: ‘द काश्मीर फाइल्स’नंतर विवेक अग्निहोत्रींचा धमाका; ‘ऑपरेशन सिंदूर’ चित्रपटाची अधिकृत घोषणा
भूषण कुमार यांची टी-सीरीज आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांची आय एम बुद्धा प्रॉडक्शन यांनी अधिकृतपणे 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor Film)ची घोषणा केली आहे.

Operation Sindoor Film: ‘द काश्मीर फाइल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ वर चित्रपट बनवणार आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. भूषण कुमार यांची टी-सीरीज आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांची आय एम बुद्धा प्रॉडक्शन यांनी अधिकृतपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा केली आहे.
हा चित्रपट लेफ्टनंट जनरल के.जे.एस. ‘टायनी’ ढिल्लो (रिटायर्ड) यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक्स इनसाइड पाकिस्तान’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री करणार आहेत. Operation Sindoor Film
View this post on Instagram
भूषण कुमार आणि विवेक अग्निहोत्री पहिल्यांदाच एकत्र Operation Sindoor Film
भूषण कुमार आणि विवेक अग्निहोत्री पहिल्यांदाच या निमित्ताने एका मोठ्या सिनेमासाठी एकत्र काम करणार आहेत. निर्माते भूषण कुमार यांनी या प्रकल्पाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना सांगितले की, “विवेक अग्निहोत्री यांच्याकडे कथा सांगण्याची एक वेगळी आणि प्रभावी शैली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
मीडिया रिपोर्टनुसार ‘ऑपरेशन सिंदूर’ हा चित्रपट पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानवर केलेल्या थरारक मोहिमेवर आधारीत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून, यात कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Operation Sindoor Film
हेही वाचा:





