Vivek Agnihotri : वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचा यूटर्न; स्पष्टीकरण देत म्हणाले “मी गंमतीने…”

Vivek Agnihotri : नुकतेच एका मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी वरण भात म्हणजे गरिब लोकांचं जेवण असल्याचं संतापजनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने ते वादात सापडले होते. सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याला घेऊन टीकेची झोड उठविण्यात आली होती. अखेर अग्निहोत्री यांनी या वक्तव्यावरून यू टर्न घेत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
‘द रौनक पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीत या वक्तव्यावर भाष्य करताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मी गंमतीत म्हणालो की, मी जेव्हा दिल्लीहून मुंबईला गेलो होतो, तेव्हा महाराष्ट्रीय असणाऱ्या पल्लवीने मला वरण भात खाऊ घातला. वरणात तर मीठही नसतं, तर मी दिल्लीवाले जसे असतात त्या शैलीत म्हटलं की, अरे हे काय मी गरिबांचं खाणं खाऊ? असं स्पष्टीकरण त्यानं दिलं आहे.
यापुढे ते असंही म्हणाले की, जशी मला अक्कल आली तेव्हा समजलेलं की, भारतात महाराष्ट्रीयन अन्न हे सर्वात हेल्दी आहे. जे मी आता खूप आवडीने खातो. वरण भात माझं आवडतं खाणं आहे, असं आता वादानंतर विविके अग्निहोत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी नुकतीच कर्ली टेल्स या पॅाडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी मराठी जेवणबाबात वादग्रस्त विधान केलं होतं.
सिनेमाही वादाच्या भोवऱ्यात
नुकताच दिग्दर्शक विविके अग्निहोत्री यांच्या द बंगाल फाइल्स सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पण हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अग्निहोत्री यांची अशी विधानं करण्याची पहिलीचं वेळ नाही याअगोदरही त्यांनी अशी विधान करून वाद ओढवून घेतला आहे. आता पुन्हा एकदा थेट मराठी लोकांच्या जेवणाबाबतच चीड आणणारं वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यावरून त्यांनी आता यूटर्न घेतला आहे.
मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप





