Vitamin Deficiency : जर तुम्ही फारसे शारीरिक काम केले नसतानाही दिवसभर थकवा जाणवत असेल, तर हे दुर्लक्ष करण्यासारखे नाही. अशी सततच थकवा येणे हे शरीरातील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. वेळेवर लक्ष न दिल्यास ही कमतरता पुढे गंभीर आजारांचे रूप घेऊ शकते. साधारणपणे काम केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविक आहे. मात्र, दिवसभर आळस, अशक्तपणा आणि ऊर्जा नसल्यासारखी भावना सतत राहात असेल, तर त्यामागे शरीरातील पोषक घटकांची कमतरता कारणीभूत असू शकते. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे काय? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे एक नव्हे तर ८ वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचे समूह आहे. यामध्ये बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-7, बी-9 आणि बी-12 यांचा समावेश होतो. हे सर्व व्हिटॅमिन्स शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात आणि मेंदू, नस, रक्तनिर्मिती तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या व्हिटॅमिन्सपैकी एखाद्याचीही कमतरता असल्यास खालील समस्या दिसू शकतात, सतत थकवा आणि कमजोरी केस गळणे चक्कर येणे आठवणीची समस्या त्वचेचे आजार हात-पायांत मुंग्या येणे किंवा सुन्नपणा अॅनिमिया डोळ्यांची दृष्टी कमी होणे नैराश्य (डिप्रेशन) मानसिक आरोग्यावर परिणाम शरीरात ऊर्जा कशी कमी होते? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम करते. ही पाण्यात विरघळणारी व्हिटॅमिन्स असल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते. जर अन्न ऊर्जा बनू शकले नाही, तर शरीर आणि मन दोन्ही थकलेले वाटते. कमतरता कशी भरून काढावी? व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स अन्नातून मर्यादित प्रमाणातच मिळते. शाकाहारी आहारात: हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य, दूध, दही, काही फळे मांसाहारी आहारात: मांस, मासे, चिकन, अंडी याशिवाय दिवसभर थकवा जाणवत असल्यास चहा-कॉफीचे सेवन कमी करा आणि डबाबंद, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. तरीही फरक जाणवत नसेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे योग्य ठरते. सततचा थकवा हा इतर आजारांचाही संकेत असू शकतो. त्यामुळे दीर्घकाळ हा त्रास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.