पिंपरी | महाड चवदार तळ्यावर येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही

खालापूर,(वार्ताहर) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या सत्याग्रहाचा वर्धापन दिनानिमित्त १९ मार्चपासून महाडमध्ये हजारो अनुयायी येता. येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली.
महाड चवदार तळ्यावर लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आठ तास वाहतुकोंडी होते. याचा त्रास कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाश्यांनाही त्रास होतो. यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यावरील मुख्य चौकात वाहतुक पोलीस नियुक्त करणे, दिशादर्शक फलक लावणे, नगरपरिषदेकडुन, साफसफाई, लाईटसची व्यवस्था आरोगय व्यवस्था, चवदार तळे, क्रांती स्तंभ व शासकीय विश्रामगृह या सर्व ठिकाणी फिरुन गायकवाड यांनी पाहणी केली.
यावेळी महाड तालुकाध्यक्ष मोहन खांबे, सचिव लक्ष्मण जाधव, महाड शहराध्यक्ष प्रभाकर खांबे आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यांच्याकडून चोख व्यवस्था केल्यामुळे भीम अनुयाची गैरसोय होणार नाही, अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.





