satara | विश्वंभरबाबा पायी दिंडी सोहळा

मेढा, (प्रतिनिधी)- प्रातःस्मरणीय वै. हभप गुरुवर्य भिकोबा महाराज देशमुख (गांजे) यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने विश्वंभरबाबा आषाढी पायी दिंडी सोहळा गेले 28 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. याही वर्षी हा दिंडी सोहळा हजारो भाविकांना एकत्र घेऊन मौजे मेढा येथून येत्या शनिवार दि. 29 जून रोजी दुपारी 12.30 वाजता आळंदीकडे प्रस्थान करणार आहे.
जावळी तालुक्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व वारकरी व भाविकांनी या नामयज्ञ दिंडी सोहळ्यामध्ये मोठया संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वंभरबाबा पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख हभप गुरुवर्य अतुल महाराज देशमुख (गांजे) यांनी केले आहे.
तसेच दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष नारायण श्रीपती धनावडे (मामुर्डी). उपाध्यक्ष दत्तात्रय बबन खताळ (मेढा), सचिव भजन सम्राट तुकाराम देशमुख (गांजे), सौ. अंजना काशिनाथ भोसले.
कार्याध्यक्ष विठ्ठल दगडू सापते, माजी अध्यक्ष हभप रामचंद्र महाराज पवार (निझरे) तसेच दिंडी सोहळा संचालक विलास आबा पवार, सचिनशेठ मगरे, अनिल कदम नाना, विठ्ठल महाराज कदम, हभप शिवराम महाराज मोरे, हभप दीपेश महाराज जाधव, हभप अनिल महाराज तोरणे, वैभवशेठ करंजेकर व विश्वंभर बाबा दिंडी सोहळा सर्व संचालक मंडळाच्यावतीने दिंडीचे नियोजन केले जात आहे.
विश्वंभरबाबा आषाढी पायी दिडी जावळीचे एक अधात्म वैभव असून वारकरी भाविक- भक्तांचे मोठे श्रध्दास्थान आहे. या दिंडी प्रस्थान सोहळ्यासाठी शनिवारी सहभागी व्हावे. – ह. भ. प. अतुल महाराज देशमुख (गांजे)





