Satara: विसापूरच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा
Satara पावसाने उघडीप दिल्याने काससारख्या निसर्गरम्य परिसरात एकत्रित आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

Satara: विसापूर (ता. खटाव) येथील श्री संत गुंडोजीबाबा विद्यालयातील दहावीच्या २००१- ०२ च्या बॅचचा स्नेहमेळावा कास तलावाजवळच्या निसर्गरम्य परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षक एन. आर. मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला उपस्थित शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी पुनर्भेटीचा आनंद घेत विविध आठवणींना उजाळा दिला.
पावसाने उघडीप दिल्याने काससारख्या निसर्गरम्य परिसरात एकत्रित आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सुखी जीवनासाठी अर्थाजनाबरोबरच अध्यात्माचा अगिकार केला तर रक्दाब, मधुमेह यासारख्या विकारांना दूर ठेवता येते व एकाग्रता वाढून दैनंदिन कामकाजात सुधारणा करता येते, असे श्री. एन. आर. मुळए सर यांनी सांगितले. आर. एन. पवार, एस. एस. गुरव, दणाणे, केंगार आदी आजी माजी शिक्षकांनी यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळून मेळाव्यातील रंगत वाढवित आनंद लुटला. काहींनी गाणी, नृत्याद्वारे मनोरंजन केले. अनेकांनी आपले अनुभव सांगत इतरांना प्रोत्साहन दिले. काहींनी गप्पांद्वारे एकमेकांची परिस्थिती जाणून घेतली.
या मेळाव्यासाठी अमेरिकेतून आलेल्या मैत्रिणीसमवेत विद्यार्थिनींनी फोटो सेशन केले. मेळाव्यात बनसोडे सर, पोटफोडे सर, गायकवाड सर, एम. डी सावंत सर, शिंदे सर, प्रभावळे सर, श्रीमती जाधव आदी शिक्षक सहभागी झाले. प्रल्हाद वायदंडे, कृष्णात साळुंखे, कैलास साळुंखे, अनिल बिटले, साधना जरग, करिष्मा मुलाणी, शीतल पाटील या विद्यार्थी प्रतिनिधींनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.





