Shikhar Dhawan’s retirement : गब्बर…! तू दिलेला वारसा कायम राहील – कोहली

Virat Kohli on Shikhar Dhawan’s retirement: – भारताचा ‘गब्बर’ असलेल्या शिखर धवनने शनिवारी क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. ३७ वर्षांच्या खेळाडूने ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय व ६८ टी-२० लढतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. शिखरच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात असणाऱ्या विराट कोहलीने सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
तू केलेल्या दमदार पदार्पणानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीचा विश्वासू सलामीवीर बनलास, या तुझ्या प्रवासात तू आम्हाला अनेक आठवणी दिल्या असून तुझे स्मित हास्य आणि तुझी खिलाडूवृत्ती आम्ही गमावली आहे. मात्र, तू दिलेला वारसा अजूनही कायम आहे, अशी भावना विराट कोहलीने व्यक्त केली. तू दिलेल्या आठवणी, केलेल्या अनेक अविस्मरणीय खेळी आणि मनापासून दाखविलेली संघभावना या सर्वांसाठी कोहलीने शिखर धवनला धन्यवाद म्हणताना , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Shikhar @SDhawan25 from your fearless debut to becoming one of India’s most dependable openers, you’ve given us countless memories to cherish. Your passion for the game, your sportsmanship and your trademark smile will be missed, but your legacy lives on. Thank you for the…
— Virat Kohli (@imVkohli) August 25, 2024
शिखर धवनने कसोटी, एकदिवसीय व टी-२० मिळून १० हजार ८६७ धावा केल्या होत्या. यामध्ये २४ शतके आणि ७९ अर्धशतकांचा समावेश आहे. सन २०१३ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने ३६३ धावांचा रतीब घालताना मालिकावीराचा सन्मान पटकावला होता.
Unofficial Test (AUS A vs IND A) : टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टीम इंडियाचा एकमेव कसोटीतही पराभव….
विराट कोहली व शिखर धवन यांनी अनेक लढतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन्हीही फलंदाज पश्चिम दिल्लीचे असल्याने दोघांची मैदानावर व मैदानाबाहेर चांगली मैत्री आहे. सुमारे एका दशकाचा काळ दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघासाठी दिला आहे, ज्यामध्ये अनेक लढतीत भारतीय संघाने विजय साकारला आहे.





