Virat Kohli’s Statue : न्युयॉर्क टाईम स्क्वेअर येथे कोहलीचा पुतळा? सोशल मीडियावर फोटो-व्हिडिओ व्हायरल…

Virat Kohli’s Statue Unveiled At Times Square :- भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट टी-20 विश्वकरंडक 2024 स्पर्धेत शांत आहे. पण त्याचा चाहता वर्ग जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. आता विराट कोहलीचा एक पुतळा न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे उभारण्यात आला आहे. त्याच्या या भल्यामोठ्या पुतळ्याचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli’s statue @ Newyork Times Square 🔥🔥 pic.twitter.com/ihSqSzevgY
— Arun Thakur👻 (@come_on_arun) June 24, 2024
टी-20 विश्वचषकात कोहलीची बॅट फारशी तळपत नसली तरी, गेल्या दशकापासून कोहलीची फलंदाजी चर्चेत आहे. विराटने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगतातील महान खेळाडूंमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीची ही मोठा पुतळा टाईम्स स्क्वेअरवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, विराट कोहलीचा पुतळा टाइम्स स्क्वेअरच्या मध्यभागी बॅट धरून उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, विराटचा हा पुतळा मॅट्रेस कंपनीच्या प्रचार मोहिमेचा भाग आहे ज्याचा विराट कोहली सदिच्छादूत आहे. ज्यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.





