IPL 2025 : आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर! विराटच्या आक्रमक सेलिब्रशनने गाजवलं मैदान, पाहा VIDEO

IPL 2025 Virat Kohli’s celebration video viral : आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, आरसीबीच्या करिष्माई गोलंदाजीने पंजाब संघावर कहर केला. बहुतेक फलंदाजांना दुहेरी आकडा ओलांडता आला नाही. ज्यामुळे पंजाब किंग्ज संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर गारद झाला. दरम्यान या सामन्यात खूपच आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसला.
प्रथम यश दयाल, नंतर जोश हेझलवूडने धारदार गोलंदाजीने कहर केला. त्यानंतर सुयश शर्माने दमदार गोलंदाजी करताना तीन मोठ्या फलंदाजांना त्याच्या फिरकीत अडकवले. या तीन गोलंदाजांनी पंजाबच्या जवळजवळ अर्ध्या संघाला बाद केले. या दरम्यान, विराट कोहलीचा सेलिब्रेशन देखील व्हायरल होऊ लागले. आज विराटची ऊर्जा वेगळ्याच पातळीवर होती. ज्याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
THE CELEBRATION FROM VIRAT KOHLI.!!
– Josh Hazlewood Hazlegod gets Shreyas Iyer & Josh Inglis
– Yash Dayal gets Priyansh Arya & Nehal Wadhera
– Bhuvi gets PrabhSimran Singh.!!
– RCB RCB at Mullanpur in Qualifier 1.!!
— MANU. (@IMManu_18) May 29, 2025
विराट कोहलीचे सेलिब्रेशन व्हायरल –
Josh is soooo back! 🔥
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 29, 2025
चंदीगडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, जेव्हा जेव्हा पंजाब किंग्जची विकेट पडायची, तेव्हा तेव्हा विराट कोहलीचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले तेव्हा विराट कोहलीने सर्वात आक्रमक सेलिब्रेशन केले. प्रभसिमरनच्या विकेटनंतर, विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडी सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला.
हेही वाचा – IPL 2025 : आरसीबीच्या जेतेपदासाठी चाहत्याचं देवाकडं साकडं, VIDEO होतोय तुफान व्हायरल
यानंतर, जोश हेझलवूडच्या षटकात श्रेयस अय्यरही आउट झाला. श्रेयस अय्यर बाद होताच पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अय्यरच्या विकेट्नंतर विराट कोहलीचा आनंद आणखीनच द्विगुणीत झाला. ज्यामुळे त्याने वेगळ्याच शैलीत सेलिब्रेशन केले. त्याचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा – IPL 2025 : ‘यंदा ‘हा’ संघ पटकावणार जेतेपद…’, शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, पाहा VIDEO
आरसीबीच्या सर्व गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाब किंग्जचा डाव १०१ धावांवर गुंडाळला. ज्यामध्ये आरसीबीकडून जोश हेझलवूडने २१ धावांत ३, सुयश शर्माने ३, यश दयालने २, भुवनेश्वर कुमारने १ आणि रोमारियो शेफर्डने १ विकेच्स घेत पंजाब किंग्जचा संघ १०१ धावांत गुंडाळला.





