CSK vs RCB : “पुढच्या वेळेस तू फक्त ये, मग बघ कसे फटके…”, संतापलेल्या विराटने खलील दिला ओपन चॅलेज, VIDEO होतोय व्हायरल

CSK vs RCB Virat Kohli Gives Challenge to Khaleel Ahmed : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ ची सुरुवात सलग २ विजयांसह केली. २८ मार्च रोजी सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने ५० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. आरसीबीने १७ वर्षांनंतर प्रथमच चेपॉकवर सीएसकेला पराभूत केले. याआधी २००८ मध्ये आरसीबीने सीएसकेला चेपॉकवर हरवले होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सामन्यानंतरचा आहे, ज्यामध्ये विराट एका सीएसके खेळाडूवर संतापलेला दिसत आहे.
विराट कोहली आणि खलील अहमदचा व्हिडीओ व्हायरल –
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज खलील अहमद विराट कोहलीसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सामन्यानंतर विराट कोहली रवींद्र जडेजासोबत उभा आहे आणि हसत आणि विनोद करत आहे. मग खलील अहमद त्याच्याकडे येतो. पण खलीलला पाहताच विराट कोहली रागाने काहीतरी बोलताना दिसला. दरम्यान, खलील अहमद शांतपणे ऐकत होत. या सामन्यात विराटला फक्त ३१ धावा करता आल्या.
विराट खलीलला काय म्हणाला?
Virat be lyk – next match chinnaswamy lo kanpadra nuvu kodaka .. 😂😂
Khaleel ahmed gadiki pant jaripodi odiley pic.twitter.com/MmphDbCUra
— VARMA (@AjjjuVarma) March 29, 2025
सामन्यानंतर विराट खलीलला सामन्यात झालेल्या घटनेची आठवण करून देत होता, असे चाहत्यांनी निदर्शनास आणले. याशिवाय, विराट खलीलला म्हणताना दिसतोय, “पुढच्या वेळेस तू बघ फक्त कसे फटके खेळतो, तू ये फक्त पुढच्या वेळेस…” असं म्हणत विराटने खलीलला खुलं आव्हान दिलं आहे. दरम्यान, सीएसके आणि आरसीबी यांच्यात पुन्हा एकदा सामना होणार आहे. हा सामना आरसीबीच्या घरच्या मैदानावर, चिन्नास्वामी स्टेडियमवर, ३ मे रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा – CSK vs RCB : आरसीबीचा चेपॉकवर ऐतिहासिक विजय! १७ वर्षांनंतर सीएसकेला चारली पराभवाची धूळ
सामन्यादरम्यान काय झालं होतं?
No khaleel no bro😑 pic.twitter.com/krvrVH1FU5
— Naeem (@1eight_18) March 28, 2025
खरं तर, सामन्यात, विराट कोहलीला खलील अहमदच्या गोलंदाजीसमोर थोडा संघर्ष करताना दिसला आणि पहिल्याच चेंडूवर तो थोडक्यात वाचला. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर खलील अहमदने बाउन्सर टाकला, जो कोहलीने पूल करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट चेंडूपर्यंत पोहोचली नाही. यानंतर, फॉलोथ्रू दरम्यान खलील कोहलीच्या खूप जवळ आला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर विराटनेही खलीलकडे रागाने पाहिले. अशा परिस्थितीत, चाहत्यांचा असा विश्वास आहे की विराट सामन्यानंतर या घटनेबद्दल खलीलला फटकारत होता.





