Virat Kohli Doppelganger : विराट कोहलीचा ‘छोटा अवतार’ पाहून स्वत: किंग कोहलीही थक्क! फोटो होतोय तुफान व्हायरल

Virat Kohli Doppelganger child photo viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यासाठी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या वडोदरामध्ये घाम गाळत आहे. सरावासोबतच विराट सध्या जाहिरातींचे शूटिंग आणि चाहत्यांच्या भेटीगाठीत व्यस्थ आहे. यादरम्यान, विराट एका अशा ‘छोट्या’ चाहत्याला भेटला, ज्याला पाहून खुद्द क्रिकेटचा किंगही अवाक झाला. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
विराट का झाला हैराण?
विराटकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेला हा चिमुकूला चाहता हुबेहूब विराट कोहलीसारखा दिसत होता. विशेष म्हणजे, या मुलाचा चेहरा विराटच्या बालपणीच्या फोटोंशी कमालीचा मिळताजुळता आहे. जेव्हा विराटने त्या मुलाला पाहिले, तेव्हा तो केवळ हसलाच नाही तर काही काळ थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. जणू विराटला आपला स्वतःचा बालपणीचा चेहराच समोर दिसत होता. या साम्यामुळेच या जोडीचा फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
Virat Kohli giving autographs to little fans at Baroda. 👑♥️
– King Kohli, The favourite of all..!!! pic.twitter.com/BMRDyWq8Yx
— Tanuj (@ImTanujSingh) January 9, 2026
कोटाम्बी स्टेडियमवर विराटला मोठा बहुमान –
रविवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेला सुरुवात होत आहे. सामन्यापूर्वी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना खास सन्मान देण्यात येणार आहे. मालिकेच्या उद्घाटनावेळी विराट कोहलीच्या हस्ते ‘तिरंगा’ फडकवण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी बीसीसीआयचे मोठे अधिकारी आणि आयसीसीचे प्रमुख जय शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – K Lalremruata Death : धक्कादायक! फलंदाजी आटोपून पॅव्हेलियनला जाताना भारतीय क्रिकेटपटूचा अचानक मृत्यू
विराटच्या निशाण्यावर ४ मोठे रेकॉर्ड्स!
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत विराट कोहलीला अनेक जागतिक विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.
- १० धावा: या मालिकेत अवघ्या १० धावा करताच विराट न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेल्या वन-डे सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
- २५ धावा: विराट कोहलीने २५ धावा केल्यास, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २८,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनेल.
- ९४ धावा: मालिकेत एकूण ९४ धावा केल्यास तो न्यूझीलंडविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो.
- १ शतक: जर विराटने या मालिकेत एक शतक झळकावले, तर न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरेल.





