Melbourne Airport : मेलबर्न विमानतळावर विराट कोहलीचा महिला रिपोर्टरसोबत जोरदार वाद! जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण…

Virat Kohli’s Clash At Melbourne Airport | विराट कोहलीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित ठेवून भारतीय संघ गुरुवारी मेलबर्नला पोहोचला. मेलबर्नला दाखल होताच एअरपोर्टवर विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? या वादाचे नेमके कारण आता समोर आले आहे. कोहलीच्या या वादामागचे कारण म्हणजे त्याच्या कुटुंबियांशी निगडीत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली मेलबर्न विमानतळावर दाखल होताच एका महिला टीव्ही रिपोर्टरवर चिडला व त्याच्यात वाद झाला. वास्ताविक ऑस्ट्रेलियन पत्रकाराने आपल्या मुलांचे फोटो काढले असे कोहलीला वाटले. ही गोष्ट कोहलीला आवडत नाही. आपल्या मुलांच्या प्रायव्हसीमध्ये थोडीशी चूकही त्याला सहन होत नाही. यामुळे त्यांनी विमानतळावरील ऑस्ट्रेलियन पत्रकाराला याबाबत कडक शब्दात विचारणा केली आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिला पत्रकाराशी वाद घालताना दिसतो आहे.
Virat Kohli had a confrontation with the Australian media in Melbourne after they were taking pictures of his family without permission. pic.twitter.com/SCPktXtrlU
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) December 19, 2024
वास्तविक, टीम इंडिया गुरुवारी ब्रिस्बेनहून मेलबर्नला पोहोचली. विमानतळावर परदेशी माध्यमातील अनेक पत्रकार उपस्थित होते. एका चॅनलनं दिलेल्या वृत्तानुसार कोहलीचे कुटुंबही मेलबर्नला पोहोचले आहे. येथे त्यांनी पत्रकारांना फोटो किंवा व्हिडिओ काढू नका, अशी विनंती केली. मात्र मिडियाला हे मान्य नव्हते. यावर कोहली नाराज झाला आणि त्याने नाराजी व्यक्त केली. कोहली म्हणाला, “मला माझ्या मुलांसोबत प्रायव्हसी हवी आहे. माझ्या संमतीशिवाय तुम्ही चित्रीकरण करू शकत नाही.”
विराट त्याच्या कुटुंबाबाबत खूप संवेदनशील आहे. मुलगी वामिकाच्या जन्मानंतरही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये गोपनीयतेची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. विराटला त्याच्या कुटुंबाला मीडियापासून दूर ठेवायला आवडते.
यासंदर्भात, संबंधित न्यूज चॅनलच्या रिपोर्टरने स्पष्टीकरण दिले की, “कॅमेरा पाहिल्यानंतर कोहलीला राग आला. त्याला वाटले की त्यांच्या मुलांचे आम्ही फोटो काढले आहेत पण त्याच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केलेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओ काढले नाहीत. हा केवळ त्याचा गैरसमज होता.”
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना भारताने 295 धावांनी जिंकला होता. तर दुसरा सामना कांगारूंनी 10 गडी राखून जिंकला. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. आता चौथा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना 26 डिसेंबरपासून होणार आहे. यानंतर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.





