Virat Kohli Record : चेस मास्टर इज बॅक! विराट कोहलीने केला ऐतिहासिक पराक्रम; RCB ने मोडला राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड
Virat Kohli Record : आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने विजयाचा झेंडा फडकावताना क्रिकेट विश्वातील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.

Virat Kohli Record 4000 in IPL run chases : आयपीएल २०२६ च्या सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने (SRH) दिलेले २०२ धावांचे तगडे आव्हान आरसीबीने केवळ १५.४ ओव्हरमध्ये पूर्ण करत ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीने नाबाद ६९ धावांची खेळी करताना आयपीएलमध्ये ‘धावांचा पाठलाग (Run Chase)’ करताना ४००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
विराट कोहली: ‘चेस मास्टर’चा नवा अवतार –
विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना ४०२७ धावा केल्या आहेत. या यादीत त्याच्या आसपासही कोणी नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेला डेव्हिड वॉर्नर (३२८५ धावा) कोहलीपेक्षा जवळपास ८०० धावांनी मागे आहे. हैदराबादविरुद्ध विराटने ३८ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची नाबाद वादळी खेळी केली.
Chasing? That’s his game. 😮💨🔥
4️⃣0️⃣0️⃣0️⃣* runs while chasing in the #TATAIPL. 🎯
A first. THE standard. KING KOHLI. 👑 pic.twitter.com/Z16c9Jprm9
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 28, 2026
आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
- ४०२७ – विराट कोहली
- ३२८५ – डेव्हिड वॉर्नर
- ३२३८ – रोहित शर्मा
- २८४३- शिखर धवन
- २८३२ – रॉबिन उथप्पा
आरसीबीने रचला इतिहासातील सर्वात मोठा विक्रम –
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीने सर्वात जलद २०० धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला. (Virat Kohli Record)
या सामन्यात २०२ धावांचे लक्ष्य अवघ्या १५.४ ओव्हरमध्ये गाठून आरसीबीने आयपीएलमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत गाठण्याचा विक्रम आता आरसीबीच्या नावावर आहे. यापूर्वी २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध २१० धावांचे लक्ष्य १५.५ ओव्हरमध्ये गाठले होते, तो रेकॉर्ड आता आरसीबीने मोडला आहे.
या सामन्यात पदार्पण करणाऱ्या जेकब डफीने २२ धावांत ३ विकेट्स घेत हैदराबादची दाणादाण उडवली. हैदराबादच्या बाजूने कर्णधार इशान किशनची ८० धावांची खेळी व्यर्थ ठरली. देवदत्त पडिक्कलनेही २६ चेंडूत ६१ धावांची धडाकेबाज खेळी करत आरसीबीच्या विजयाचा मार्ग सुकर केला.





