Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराटने व्यक्त केला शोक; म्हणाला, ‘या क्रूरतेची शिक्षा…’

Virat Kohli react on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन मैदानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीतील पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यात कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीतील दोन परदेशी नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला.
विराटने सोशल मीडियावर व्यक्त केला शोक –
Today, my respect for Virat Kohli has increased immensely !!!🙌🏻❤️
Rohit Sharma, MS Dhoni, and other cricketers should learn from him how to stand by the nation in difficult times.🇮🇳
He is truly 𝐊𝐈𝐍𝐆 𝐊𝐎𝐇𝐋𝐈 !!!👑#PahalgamTerroristAttack #ViratKohli #KingKohli pic.twitter.com/RIci53JvB7
— 🇮🇳Tanmay Kulkarni🇮🇳 (@Tanmaycoolkarni) April 23, 2025
या हल्ल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “पहलगाममधील निष्पाप लोकांवर झालेल्या या क्रूर हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी शांती आणि शक्तीसाठी प्रार्थना. या क्रूरतेला नक्कीच न्याय मिळेल.”
हेही वाचा – Nicholas Pooran : आधी डोकं फोडलं, मग भेटायला बोलावलं; निकोलस पूरन आणि त्याच्या फॅनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
पीडितांना नुकसानभरपाई जाहीर –
पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेऊन जम्मू आणि काश्मीर सरकारने पीडितांना भरपाई जाहीर केली. जम्मू आणि काश्मीर सरकार मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदत देणार आहे.





