Virat Kohli new look : IPL 2025 पूर्वी विराटच्या नवीन लूक आणि हेअर स्टाईलने वेधले सर्वांचे लक्ष, PHOTOS होतायेत व्हायरल

Virat Kohli’s new look viral ahead IPL 2025 : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर, विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पहिली ट्रॉफी मिळवून देण्यात व्यस्त आहे. मात्र, याआधी त्याने आपला लूक बदलला आहे. त्याने त्याची हेअरस्टाईल बदलली आहे. तो त्याच्या नवीन लूकमध्ये खूपच जबरदस्त दिसत आहे. किंग कोहलीच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहलीचा नवा लूक व्हायरल –
आता चाहत्यांना विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये धमाल करताना दिसणार आहे. परंतु, ही लीग सुरू होण्यापूर्वीच कोहलीच्या नवीन लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो त्याची नवीन हेअरस्टाईल दाखवत आहे. त्याच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत आहेत.
विराटची चॅम्पियन्स ट्रॉफीत कौतुकास्पद कामगिरी –
View this post on Instagram
नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या. त्याने या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली. त्याच्या फलंदाजीसमोर सर्वोत्तम गोलंदाजही अपयशी ठरत होते. विशेषतः कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळलेली खेळी कौतुकास्पद होती.
The G.O.A.T Energy! 🔥🔥🔥
Fresh Snip For One & Only @imVkohli 👑🏏🔥💇♂️💈
Looking Razor Sharp! 🙌😎🚀
📸 : @AalimHakim
⚡ #KingKohli #HairbyAalimHakim #viratkohli 👑 #aalimhakim 💈#thegamechanger #indian pic.twitter.com/1dZ8Xj1krk
— Aalim Hakim (@AalimHakim) March 14, 2025
रजत पाटीदारच्या हाती आरसीबीची धुरा –
आता विराट कोहलीचे चाहते त्याला आयपीएलमध्ये धमाल करताना पाहू इच्छितात. जिथे तो आरसीबीला पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कोहलीमुळे आरसीबीकडे अनेक चाहते आहेत, त्यामुळे यावेळी तो त्याच्या चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, यावेळी बंगळुरूची धुरा रजत पाटीदारच्या हाती आहे.





