ICC ODI Rankings : किंग कोहलीची मोठी झेप; रोहित-विराटमध्ये ‘नंबर वन’ साठी चुरस!

Virat Kohli jumps to no 2 in ICC ODI batting rankings : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. तो अजूनही पहिल्या क्रमांकावर पोहोचला नसला तरी, त्याने विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दोन वनडे सामन्यांमध्ये कोहलीने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीचा फायदा त्याला रँकिंगमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
रोहित पहिल्या स्थानी कायम, कोहली दुसऱ्या क्रमांकावर –
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका संपल्यानंतर आयसीसीने वनडेची लेटेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. या लेटेस्ट रँकिंगमध्ये भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (रेटिंग ७८२) याने अजूनही पहिल्या क्रमांकाची खुर्ची कायम राखली आहे. तर, विराट कोहलीने दोन स्थानांची झेप घेत थेट दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. कोहलीचे रेटिंग आता ७७३ झाले आहे. म्हणजेच रोहित आणि कोहलीच्या रेटिंगमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. जर रोहितला आपले पहिले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर त्याला पुढील सामन्यांमध्ये मोठी खेळी करावी लागेल.
मिचेल आणि झाद्रानचे नुकसान –
Quality performances across formats have translated into fresh gains in the latest ICC Men’s Player Rankings 💪
Read more 👇https://t.co/NePL14NTcD
— ICC (@ICC) December 10, 2025
या रँकिंगमध्ये विराट कोहलीला दोन स्थानांचा फायदा झाला, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल (रेटिंग ७६६) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान (रेटिंग ७६४) यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान झाले आहे. मिचेल आता तिसऱ्या आणि झाद्रान चौथ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – IND vs SA : तिलक वर्माने नॉर्खियाला ठोकला मॉन्स्टर सिक्स! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर, पाहा VIDEO
भारताचा शुबमन गिल पाचव्या आणि पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर कायम आहेत. विशेष म्हणजे, भारताचा श्रेयस अय्यर (दहावा क्रमांक) एका स्थानाच्या नुकसानीसह टॉप-१० मध्ये आहे. श्रीलंकेचा चरिथ असलंका एका स्थानाच्या फायद्यासह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा – IND vs SA : हार्दिक पाठोपाठ गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी दणदणीत विजय
पुढील वनडे मालिका जानेवारीत –
भारतीय संघ आता या वर्षात कोणताही वनडे सामना खेळणार नाही. त्यामुळे खेळाडूंच्या रेटिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय संघ जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरताना दिसतील. या मालिकेनंतर रँकिंगमध्ये आणखी फेरबदल होण्याची शक्यता आहे.





