Virat Kohli Like Controversy : विराट कोहलीला ‘त्या’ तरुणीचा फोटो लाईक करणं पडलं महागात! स्क्रीनशॉट होतायेत तुफान व्हायरल
Virat Kohli Like Controversy : एका जर्मन इन्फ्लुएन्सरच्या फोटोला विराटने लाईक केल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Virat Kohli Instagram Like Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आरसीबीकडून आयपीएल खेळण्यात व्यग्र आहे. मात्र, गुरुवारी रात्री सोशल मीडियावर एका स्क्रीनशॉटने खळबळ उडवून दिली. जर्मनीची प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर लिझलाझ (Lizlaz) हिच्या इन्स्टाग्राम पोस्टला विराटने लाईक केल्याचे या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. हा स्क्रीनशॉट खरा आहे की फोटोशॉप, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही, पण मीम्सचा मात्र महापूर आला आहे.
अनुष्का शर्माच्या नावाने मीम्सचा पाऊस –
विराटच्या या कथित ‘लाईक’नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ आणि रेडिटवर मजेशीर कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने गमतीने लिहिले, “आता अनुष्का शर्मा नक्कीच नाराज होणार,” तर दुसऱ्याने विराटला सल्ला दिला की, “चीकू भाई, आता तरी एक प्रायव्हेट आयडी बनवून घ्या.” काही चाहत्यांनी ही इंस्टाग्राम अल्गोरिदमची चूक असू शकते असे म्हणून विराटची पाठराखणही केली आहे.
Virat Kohli has once again liked the post of an Insta female model. Now we know why he was dealing with a headache from the past 2 matches. 😭 pic.twitter.com/pSTD5McLbh
— Homie (@homelander_yyy) April 16, 2026
Kohli liked this post on Instagram. Another paragraph loading on algorithm 😭😭 pic.twitter.com/PWB9aFlY87
— ` (@WorshipDhoni) April 16, 2026
जुना ‘अवनीत कौर’ वाद पुन्हा चर्चेत –
View this post on Instagram
विराट कोहली अशा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अभिनेत्री अवनीत कौर हिच्या फोटोला लाईक केल्यामुळेही विराट चर्चेत आला होता. त्यावेळी विराटने स्पष्टीकरण दिले होते की, “फीड क्लिअर करताना अल्गोरिदममुळे चुकून ते इंट्रॅक्शन नोंदवले गेले, माझा कोणताही तसा हेतू नव्हता.” यावर अवनीतनेही “प्रेम मिळत राहो” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती.
कोण आहे लिझलाझ (LizLaz)?
View this post on Instagram
विराट ज्या इन्फ्लुएन्सरमुळे चर्चेत आला आहे, ती लिझलाझ मूळची जर्मनीची असून ती एक उत्तम ट्रॅव्हल व्लॉगर आणि सिंगर आहे. तिचे भारतात मोठे चाहते आहेत, कारण ती मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीच्या स्ट्रीट फूडचे आणि संस्कृतीचे व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सध्या या ‘लाईक’ प्रकरणावर विराट कोहलीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.





