Virat Kohli : ‘विराट कोहलीकडे सर्व काही आहे, फक्त…’, सुरेश रैनाच्या वक्तव्याने वेधलं सर्वांच लक्ष

Virat Kohli’s Quest for IPL Glory with RCB in 2025 : विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी टप्पे गाठले आहेत. त्याने एकदिवसीय विश्वचषक, दोन चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक आणि अनेक आयसीसी पुरस्कार जिंकले आहेत. मात्र, आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे त्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण झालेले नाही. गेल्या १७ वर्षांपासून आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यासाठी मेहनत घेत आहे, पण त्याला यश मिळालेले नाही. मात्र, यंदाच्या हंगामात तो आरसीबीला ट्रॉफी जिंकून देऊ शकतो, असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.
कोहलीने ‘विराट’ खेळ केला तर आरसीबी ट्रॉफी जिंकेल – सुरेश रैना
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात सुरेश रैना विचारण्यात आले की विराट यंदा आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकून देईल का? यावर तो म्हणाला, “नक्कीच, तो नुकताच कसोटीतून निवृत्त झाला आहे आणि जर त्याने आरसीबीला ट्रॉफी जिंकून देण्यात योगदान दिले, तर तो खूप आनंदी होईल. तो आरसीबीची अजिंक्य ताकद आहे. त्याच्याकडे आयुष्यात सर्वकाही आहे, फक्त आरसीबी ट्रॉफी आली नाही. तो त्यासाठी नक्कीच कठोर परिश्रम करेल. मला वाटते की जर विराट कोहलीने ‘विराट’ खेळ केला तर आरसीबी या वर्षी ट्रॉफी जिंकू शकेल.”
बाकीच्या १० खेळाडूंनी विराटला साथ द्यावी – सुरेश रैना
VIRAT KOHLI FANS WINNING THE HEART OF THEIR IDOL ❤️ pic.twitter.com/sr7xUfkl7z
— Johns. (@CricCrazyJohns) May 17, 2025
सुरेश रैना पुढे म्हणाला, ” बाकीच्या १० खेळाडूंनी विराटला साथ द्यावी आणि त्याच्यासोबत उभे राहावे. त्याला परिस्थिती कशी समजून घ्यायची हे माहित आहे. आम्ही त्याचे क्रिकेटिंग शॉट्स तसेच विकेट दरम्यान धावणे पाहिले आहे. आता एक वेगळीच ऊर्जा दिसेल. त्याला आधीच ब्रेक मिळाला आहे. त्याचे एक वेगळे रूप दिसेल. त्याने हे आधी केले आहे, मग आता का नाही? आता तो असे करण्यास आणखी उत्सुक असेल.”
हेही वाचा – Ravi Shastri : जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार करण्यास रवी शास्त्रींचा विरोध, काय आहे कारण?
आज आरसीबीला मिळू शकते प्लेऑफचे तिकीट –
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. ११ पैकी ८ सामने जिंकून आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. जर आज बंगळुरूने कोलकाताला हरवले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. यानंतर, त्यांचे लक्ष उर्वरित दोन सामन्यांमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यावर असेल. या हंगामात कोहलीही पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे. तो ११ सामन्यांत ५०५ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.





