कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रोहित शर्मा ‘वर्षा’निवासस्थानी; मुख्यमंत्री फडणविसांनी भेटीदरम्यानचे शेअर केले फोटो

Rohit Sharma Meet Devendra Fadnavis | टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत रोहित शर्माने ही माहिती सांगितली. त्याच्या या निर्णयानंतर अनेकजण भावुक झाले. मात्र यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचेही रोहित शर्माने स्पष्ट केले. याचदरम्यान रोहितने ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहितसोबत अनेक विषयांवर संवाद साधला. तसेच रोहितला निवृत्तीनंतर पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. या भेटीचे फोटो फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
“वर्षा माझ्या अधिकृत निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणं, त्यांना भेटणं आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हंटले आहे.
It was great to welcome, meet and interact with Indian cricketer Rohit Sharma at my official residence Varsha. I extended my best wishes to him on his retirement from Test cricket and for continued success in the next chapter of his journey!@ImRo45#Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/G0pdzj6gQy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 13, 2025
दरम्यान, रोहित शर्मा यंदाची उर्वरित आयपीएल स्पर्धा देखील खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने 17 मे पासून खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 12 मे रोजी 17 सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा 21 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमधूनही निवृत्ती घेतली
रोहित शर्माने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावत १७७ धावांची शानदार खेळी केली. त्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला आणि रोहितला त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. गेल्या वर्षी भारताला टी-२० विश्वचषकात जेतेपद मिळवून दिल्यानंतर, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमधून निवृत्ती घेतली. Rohit Sharma Meet Devendra Fadnavis |
आता कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचे लक्ष एकदिवसीय सामन्यांवर असेल. कर्णधार म्हणून भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात आलेल्या अपयशाची भरपाई तो करू इच्छितो. रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ६७ सामन्यांमध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ कसोटी धावा केल्या आहेत. Rohit Sharma Meet Devendra Fadnavis |
हेही वाचा:
पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत





