Virat Kohli Drop Catch : विराट कोहलीनने सोडला ‘लॉलीपॉप’ कॅच! स्टँडमध्ये बसलेली अनुष्का शर्माही झाली चकित; VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Drop Catch ; विराट कोहलीने सोपा झेल सुटल्यानंतर अनुष्का शर्माने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

Virat Kohli Drop Catch Aniket Varma Anushka Sharma reaction : आयपीएल २०२६ च्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने जरी विजय मिळवला असला, तरी विराट कोहलीने सोडलेल्या कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. कारण जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीकडून झालेली चूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
आपल्या चपळाईसाठी प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीने हैदराबादचा युवा फलंदाज अनिकेत वर्माचा एक अत्यंत सोपा झेल सोडला. विराटसारख्या खेळाडूकडून झालेली ही चूक पाहून केवळ चाहतेच नव्हे, तर खुद्द त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिची प्रतिक्रियाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
Anushka Sharma laughs After Virat drops the catch !! 😂 pic.twitter.com/BycGcpVauZ
— InTheLoop (@jinx_5182) March 29, 2026
हैदराबादच्या डावातील १८ व्या षटकात ही घटना घडली. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर अनिकेत वर्माने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत बराच उंच गेला आणि लॉंग-ऑनला असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने आला. विराट वेगाने धावत चेंडूखाली पोहोचला. सर्वांना वाटले की हा झेल सहज टिपला जाईल, पण चेंडू हाताला लागून खाली पडला. झेल सुटल्यावर विराट स्वतःवरच कमालीचा संतापलेला दिसला, तर प्रेक्षक गॅलरीत असलेल्या अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरही आश्चर्यमिश्रित हास्य पाहायला मिळाले.
अनिकेत वर्माची वादळी खेळी –
Virat Kohli drops a catch and Anushka was literally laughing 😂🤣🤣 pic.twitter.com/OzfMPFydTQ
— TAUKIR (@iitaukir) March 28, 2026
विराटने सोडलेला हा झेल आरसीबीला महागात पडला असता, कारण अनिकेत वर्माने केवळ १८ चेंडूत ४३ धावांची झंझावाती खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार खेचले. अनिकेतच्या या फटकेबाजीमुळेच हैदराबादला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. जरी आरसीबीने हा सामना ६ गडी राखून जिंकला असला, तरी विराटचा हा ‘ड्रॉप कॅच’ मात्र सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहे.
नव्या हंगामात विजयाचा श्रीगणेशा करणाऱ्या आरसीबीला आगामी सामन्यांत अशा चुका टाळाव्या लागतील, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.





