CSK vs RCB : विराट कोहलीने आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर केला जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Virat Kohli dancing with RCB team in dressing room After Historical win Over CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा १७ वर्षांनंतरत्यांचा बालेकिल्ल्य चेपॉकमध्ये पराभव केला. त्यामुळे आरसीबीसाठी हा विजय खूप खास होता. संपूर्ण टीमनेही हा ऐतिहासिक क्षण मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच वेळी, त्याचे चाहते चेन्नईवरील या मोठ्या विजयाचा आनंद साजरा करतानाही दिसले. आरसीबीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराटसह आरसीबीचे खेळाडू नाचताना दिसत आहेत.
सीएसकेला हरवल्यानंतर विराटने केला डान्स –
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली नाचताना दिसत आहे. विराटच्या काही अद्भुत नृत्याच्या हालचाली पाहिल्या गेल्या. कोहली व्यतिरिक्त, लुंगी एनगिडी, फिल साल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल हे देखील डान्स करताना दिसले. चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधील हा व्हिडिओ आहे.
A win so special, it got King Kohli grooving… 😍
This team! The vibes! We’re loving it. ❤
🎧: Hanumankind (Run it Up)#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #CSKvRCB pic.twitter.com/qmjASYMVFf
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 29, 2025
आरसीबीने ५० धावांनी जिंकला सामना –
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कठीण खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना, आरसीबीने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने ५१ धावांची खेळी केली. याशिवाय फिल सॉल्टने जलद ३२ धावा केल्या. कोहलीने ३० चेंडूत ३१ धावांची संथ खेळी केली. शेवटी, टिम डेव्हिडने ८ चेंडूत २२ धावा करून नाबाद राहिला. चेन्नईकडून सर्वात यशस्वी गोलंदाज नूर अहमद होता, ज्याने ३ विकेट्स घेतल्या.
१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या आणि त्यांना ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. रचिन रवींद्रने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या. याशिवाय, सीएसकेचा मधला मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. दरम्यान ९ व्या क्रमांकावर खेळताना, एमएस धोनीने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. पण तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.





