IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटीत कोहलीला इतिहास रचण्याची संधी, फक्त 129 धावांची आहे आवश्यकता…

IND vs BAN 2nd Test (Virat Kohli) : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चेन्नई कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली ग्रीन पार्कवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम रचू शकतो. 129 धावा करून तो 9000 धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल. त्याबरोबरच विराट एक हजार चौकार मारण्यापासून सात पावले दूर आहे.
चेन्नईत फ्लॉप ठरला होता विराट कोहली…
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची बॅट शांत राहिली होती. पहिल्या डावात कोहली अवघ्या 6 धावा करून तर दुसऱ्या डावात 17 धावा करून तो बाद झाला होता. अशा स्थितीत कानपूर कसोटीत कोहलीच्या बॅटमधून मोठ्या खेळीची चाहत्यांना प्रतीक्षा असेल.
कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात कोहली काही विक्रम आपल्या नावावर करू शकतो. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 17 खेळाडू 9000 धावांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. विराट कोहली याआधी ग्रीन पार्कमध्ये 5 वेळा खेळला आहे. कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा केल्या आहेत. 129 धावा होताच तो 9000 धावा पूर्ण करेल.
याशिवाय कोहली 1000 चौकार मारण्यापासून फक्त 7 धावा दूर आहे. त्याने आतापर्यंत 993 चौकार मारले आहेत. याआधी सचिन, राहुल, सेहवाग आणि लक्ष्मण यांनी एक हजार चौकार मारण्याचा पराक्रम केला आहे.





