IND vs SA : विराटच्या बुलेट शॉटने थरकाप उडाला! ऋतुराज थोडक्यात बचावला, पाहा VIDEO

विराट-ऋतुराजच्या स्फोटक भागीदारीदरम्यान एक असा क्षण आला, ज्यामुळे युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड जखमी होण्याची भीती होती. विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात असून, त्याने आक्रमक फटकेबाजी केली. याच दरम्यान, ३४ व्या षटकात कोहलीने पुढे येऊन एक जोरदार स्ट्रोक खेळला.
ऋतुराज थोडक्यात बचावला-
Virat Kohli Into the 90s with a killer shot at Ruturaj gaikwad 😭😭😭😭
Next up the Three digit mark 🤞🎯#INDvsSA #ViratKohli𓃵 https://t.co/HQJMRe8fTD pic.twitter.com/aFUOaek0Ji
— SK Chatterjee 🚩 (@SChatterjee02) December 3, 2025
विराटने तात्काळ केली विचारपूस –
विराटने मारलेला हा चेंडू इतक्या वेगात आला की, फलंदाजीच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या ऋतुराज गायकवाडच्या अगदी जवळून गेला. चेंडू येत असल्याचे पाहून ऋतुराजने त्वरित खाली जमिनीवर झोपून स्वतःला वाचवले. हा धोकादायक क्षण पाहून खुद्द विराट कोहलीही काहीसा घाबरला आणि त्याने तात्काळ ऋतुराजजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. यापूर्वीही विराटने मारलेला एक फटका ऋतुराजच्या अगदी डोक्यावरून गेला होता.
या सामन्यात विराटने वनडे कारकिर्दीतील आपले ५३ वे शतक (१०२) पूर्ण केले, तर ऋतुराज गायकवाडनेही आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक (१०५) झळकावले. पहिल्या सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर, या सामन्यात मिळालेल्या चौथ्या क्रमांकाच्या संधीचा फायदा घेत ऋतुराजने ७७ चेंडूंमध्ये वादळी शतक पूर्ण केले.
हेही वाचा –IND vs SA : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! गिल-हार्दिकचे पुनरागमन; ‘या’ खेळाडूला दिला डच्चू
ऋतुराजने शतकानंतर आपल्या यशाचे श्रेय विराट कोहलीला दिले. विराटमुळेच त्याला शतकी खेळी करताना मोठी मदत मिळाली, असे त्याने सांगितले. ऋतुराजने शतक पूर्ण करताच विराटने त्याला मिठी मारून खास कौतुक केले.





