India New Jersey : टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या नव्या जर्सीचे अनावरण! जाणून घ्या डिझाईन आणि दोन स्टार्सचा अर्थ

India New Jersey unveils for T20 World Cup 2026 : पुढील वर्षी ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे आयोजन करणार आहेत. नुकतेच आयसीसीने या प्रतिष्ठित स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. याच उत्साहात भर घालत, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान बीसीसीआयने आगामी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले.
नव्या जर्सीचे आकर्षक डिझाईन
बीसीसीआयने अनावरण केलेल्या या नवीन जर्सीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जर्सीचा लूक अधिक आकर्षक आणि मॉडर्न बनवण्यात आला आहे. जर्सीच्या कॉलरवर तिरंग्यातील तीनही रंग (केशरी, पांढरा, हिरवा) स्पष्टपणे दिसत आहेत, ज्यामुळे ती अधिक आकर्षक दिसते.
Rohit Sharma unveils the jersey for T20 World Cup 2026 🙌🏼
📸\ BCCI#indvssa #viratkohli #rohitsharma #shubmangill #bharatarmy #COTI 🇮🇳 #rishabhpant #jaspritbumrah #dhoni pic.twitter.com/4ysKSf0iDF
— The Bharat Army (@thebharatarmy) December 3, 2025
तसेच जर्सीच्या पुढील भागात हलक्या आणि गडद निळ्या रंगाच्या पट्ट्यांचे (Stripes) संयोजन आहे, जे तिला आधुनिक आणि ॲथलेटिक लूक देते. जर्सीच्या बॉर्डरवर (किनारी) केशरी रंगाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे भारतीय टीमचा पारंपारिक लूक कायम राहिला आहे.
हेही वाचा – IND vs SA : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! गिल-हार्दिकचे पुनरागमन; ‘या’ खेळाडूला दिला डच्चू
जर्सीवरील दोन स्टार्सचा अर्थ काय?
Adidas just dropped the brand new T20 jersey 😍 #T20Jersey #adidasIndia pic.twitter.com/3iu0IQUp27
— Johns. (@CricCrazyJohns) December 3, 2025
या नवीन जर्सीवर दोन चमकणारे स्टार बनवलेले आहेत. हे स्टार भारतीय क्रिकेट संघाने आजपर्यंत जिंकलेले दोन टी२० वर्ल्ड कप विजेतेपद दर्शवतात. पहिले विजेतेपद २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पटकावले होते, तर दुसरे विजेतेपद २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकले. जर्सी लॉन्च करताना कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत युवा फलंदाज तिलक वर्मा देखील उपस्थित होता. दोघांनी ही नवीन जर्सी परिधान करून चाहत्यांसमोर ती सादर केली.
७ फेब्रुवारीपासून टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात –
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी यूएसएविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याने करेल. टीम इंडियाचा दुसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध होईल. त्यानंतर सर्वात मोठी आणि हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळला जाईल.
हेही वाचा – Virat Kohli Century : किंग कोहलीचा पुन्हा शतकी धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड!
ग्रुप-ए मधील टीम इंडियाचा अंतिम सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होईल. भारतीय वेळेनुसार हे सर्व ग्रुप सामने संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. नवीन जर्सीच्या अनावरणाने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये टी-२० वर्ल्ड कप २०२६ बद्दलचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घरच्या मैदानावर विजेतेपद जिंकण्याच्या तयारीला टीम इंडिया मोठ्या स्तरावर लागली आहे.





