Virat Kohli Controversy : ‘बाळा, तू जर इतकी मेहनत…’, विराटवर टीका करणाऱ्या राहुल वैद्यला किंग कोहलीच्या भावाने झापलं

Virat Kohli and Rahul Vaidya Controversy : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. गायक राहुल वैद्य सतत विराट कोहलीवर टीका करत असतो. आता पुन्हा त्याने अवनीत कौर फोटो प्रकरणावरुन टीका केली आहे. यावरुन विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने राहुल वैद्यला जोरदार फटकारले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घेऊया.
विराटच्या भावाने राहुल वैद्यला खडसावले –
विराटचा भाऊ विकास कोहलीने त्याच्या एक्स-अकाउंटवर राहुल वैद्यवर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विकास कोहलीने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिले, ‘बाळा, जर तू तुझ्या गायनावर एवढी मेहनत केलीस तर कदाचित तू तुझ्या मेहनतीने प्रसिद्ध होशील.’ त्यानी पुढे लिहिले की, ‘सध्याच्या तणावामुळे संपूर्ण देश काय चालले आहे? याबद्दल चिंतेत असताना हा मूर्ख विराटचे नाव वापरून प्रसिद्ध होण्याच्या मोहिमेत व्यस्त आहे. तो किती लूजर आहे. त्याला विराट कोहलीच्या नावाने प्रसिद्ध व्हायचे आहे.’
Vikas kohli is cooking Rahul Vaidya again 🤣🔥 pic.twitter.com/ivtbKNOuFx
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) May 8, 2025
राहुल वैद्यने विराट मारला होता टोमणा –
View this post on Instagram
खरंतर, अवनीत कौरच्या फोटोप्रकरणात, राहुल वैद्यने विराट कोहलीला टोमणा मारता म्हटले होते की, ‘विराट कोहलीने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले आहे, पण मला वाटते की विराट कोहलीने मला ब्लॉक केले नाही. उलट, इन्स्टाच्या अल्गोरिदमने चुकून ब्लॉक केले असेल.’ त्यानंतर राहुल वैद्य ट्रोलर्सचे लक्ष्य बनला आहे. या ट्रोलिंगनंतर राहुल वैद्यने एक इंस्टा स्टोरी शेअर करत विराटच्या चाहत्यांना विराटप्रमाणे विदूषक असल्याचे म्हटले होते, त्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियाच्या खूप चर्चेत आहे.
हेही वाचा – PBKS vs DC सामना रद्द झाल्यानंतर खेळाडू घाईघाईने बाहेर पडतानाचा VIDEO व्हायरल
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अवनीत कौरची एक पोस्ट लाईक केली होती, ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर सोशल मीडियावर वेगळ्याच प्रकारची खळबळ उडाली. पण, प्रकरण वाढताना पाहून, विराटने त्याच्या इंस्टावर एक स्टोरी पोस्ट करुन स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला फीड साफ करताना, अल्गोरिदमने चुकून तो फोटो लाईक झाला आहे. त्यामुळे चुकीचे संदर्भ काढू नका, असे आवाहन केले. पण त्यांच्या स्पष्टीकरणानंतर राहुल वैद्यने त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.





