Virat Kohli Record : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! गेल-बाबरला मागे टाकत बनला टी-२० क्रिकेटचा नवा सम्राट
Virat Kohli Record : विराट कोहलीने सलामीवीर फिल सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी १२० धावांची शतकीय भागीदारी करत इतिहास रचला आहे.

Virat Kohli T20 Partnership Record : आयपीएल २०२६ च्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) मुंबई इंडियन्सविरुद्ध धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २४० धावांचा डोंगर उभा केलाच, पण ‘किंग’ विराट कोहलीने दोन अशा जागतिक विक्रमांना गवसणी घातली, ज्यामुळे क्रिकेट जगतात त्याचे स्थान पुन्हा एकदा अजरामर झाले आहे.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० धावांची संयमी खेळी साकारली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. विराटने सलामीवीर फिल सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी १२० धावांची शतकीय भागीदारी केली. या भागीदारीसह विराटने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा शतकीय भागीदारीचा (४७ वेळा) भाग राहण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Wankhede is witnessing early fireworks 🔥
Virat Kohli and Phil Salt go on the offensive from the word go! 👊
Updates ▶️ https://t.co/q1MGJfD2d8#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRCB pic.twitter.com/dJbLNIiyJm
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
विराटने बाबर-गेलला टाकलं मागे –
The image every Indian cricket fan feared tonight. 💔
Virat Kohli watching from the dugout as Rohit Sharma walks off injured. The two pillars of our team both out of action in the same game. This hurts to watch.
Praying it’s nothing serious for the legends. 🙏🇮🇳
#MIvRCB… pic.twitter.com/MInawXmfj9— The Free Hit (@THEFREEHITHQ) April 12, 2026
विराटने या विक्रमात पाकिस्तानच्या बाबर आझम आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल या दोघांनाही एका झटक्यात मागे टाकले आहे. यापूर्वी हे तिन्ही खेळाडू ४६ शतकीय भागीदारींसह संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. मात्र, मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर विराटने ४७ व्या भागीदारीसह प्रथम स्थान पटकावले आहे. डेव्हिड वॉर्नर (४५) आणि फाफ डु प्लेसिस (४०) हे या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.
शिखर धवनच्या विक्रमाशी केली बरोबरी –
विराट कोहलीने केवळ जागतिक स्तरावरच नाही, तर आयपीएलमध्येही नवा टप्पा गाठला आहे. सलामीवीर (Opener) म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा (Fifty Plus) करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटने शिखर धवनची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी ४९ फिफ्टी प्लस खेळी आहेत. या यादीत डेव्हिड वॉर्नर ६० अशा खेळींसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.





