दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात या वर्षीचा शेवट कसोटी क्रमवारीतील अव्वल फलंदाज कोहली असा होईल.कोहली ९२८ अंकासह पहिल्या तर स्टीव स्मिथ ९११ अंकासह दुस-या आणि केन विलियमसन ८६४ अंकासह तिस-या स्थानी कायम आहे.
Babar Azam achieves his career-highest rating to rise to No.6 on the @MRFWorldwide ICC Test Rankings for batting!
Updated rankings: https://t.co/UQn9xI4e8K pic.twitter.com/XFRahIlKOd
— ICC (@ICC) December 24, 2019
भारताचा चेतेश्वर पूजारा ७९१ अंकासह चौथ्या तर मार्नस लबूशेन ७८६ अंकासह पाचव्या स्थानी आहे. भारताच्या अंजिक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली असून ७५९ अंकासह तो सातव्या स्थानी पोहचला आहे. त्यांची जागा पाकिस्तानच्या बाबर आझमने घेतली असून आझम ७६७ अंकासह सहाव्या स्थानी आहे.
आझमने नुकत्याच श्रीलंकेविरूध्द झालेल्या दुस-या कसोटीत नाबाद शतकी आणि ६० धावांची खेळी केली होती, याचा फायदा त्याला क्रमावारीत झाला आणि त्याने नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारी आहे. क्रमवारीत टाॅप २० मध्ये दोन फलंदाजाचा समावेश आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल १२ व्या आणि रोहित शर्मा १५ व्या स्थानी आहे.