Shirur News : नगरविकास विभागाच्या पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरूर नगरपरिषदेचे घवघवीत यश

शिरूर : राज्यात क्रीडा, संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी, पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा धोरण जाहीर केले आहे. यामध्ये जिल्हास्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता दि. ०८ जानेवारी२०२५ ते दि.११ जानेवारी २०२५ या कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायती यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये शिरूर नगर परिषदेच्या वतीने साधारण ४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय भाग घेतला होता. सदरील नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय शिरूर नगरपरिषदेचा पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धामध्ये उत्तम सहभाग नोंदवून प्रितम पाटील, प्रशासक तथा मुख्याधिकारी, यांच्या मार्गदर्शना खाली १२ पदके मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरुर संघाचा इतर सर्व संघावर विजय मिळवत प्रथम विजेता होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
तसेच इतर स्पर्धेत मिळालेले यश खालील प्रमाणे :
वैयक्तिक स्पर्धेत एकूण १० पदके, पैकी ५ प्रथम विजेते आहेत. यामध्ये प्रदीप साळवे- गोळा फेक प्रथम, प्रदीप साळवे- लांब उडी प्रथम, प्रदीप साळवे- उंच उडी प्रथम क्रमांक, प्रदीप साळवे- १०० मी प्रथम, पंकज माने- थाळी फेक प्रथम क्रमांक, शितल काळे- २०० मी द्वितीय क्रमांक (महिला),शितल काळे- ४०० मी तृतीय क्रमांक (महिला), शितल काळे- ३ किमी द्वितीय क्रमांक (महिला), संदीप चव्हाण- लांब उडी- द्वितीय क्रमांक, रामचंद्र नरवडे- प्रहसन प्रथम क्रमांक, प्रदीप साळवे, नवनाथ मते, संदीप चव्हाण, पंकज माने- १०० मी. रिले प्रथम क्रमांक, तसेच सांघिक स्पर्धेत २ पदके प्राप्त झाले आहेत.
सदरील स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हा सह आयुक्त माननीय दुर्वास साहेब, मुख्याधिकारी, स्पर्धेत भाग घेतलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदेस प्राप्त झालेले बक्षिस बक्षीस वितरण अजित दादा पवार साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले आहे.





