RCB vs KKR : स्टेडियममध्ये ‘हे’ गाणं वाजताच संतापला विराट; लगेच करायला लावलं बंद, काय होतं कारण?

Virat Kohli’s Anger at IPL 2025 RCB vs KKR Match : भारत-पाक तणावानंतर पुन्हा आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला सुरुवात झाली आहे. १७ मे रोजी आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने झाली. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून दिले, ज्याचा फटका केकेआरला बसला. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहरे पडला. दरम्यान या सामन्यात विराट कोहली चांगलाच संतापला होता. या मागे काय कारण होते? जाणून घेऊया.
विराट आरसीबी संघाचे गाणे वाजताच संतापला –
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात परतत होता. पण या सामन्यापूर्वी कोहली खूप रागावलेला दिसत होता. स्टेडियमच्या साउंड सिस्टीमवर आरसीबीच्या संघाचे गाणे वाजत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये उघड झाले आहे आणि ते ऐकून त्याला राग आला. त्याने ते लगेच बंद केले. पण त्याला त्याच्याच टीमच्या गाण्यावर इतका राग का आला? हे जाणून घेऊया.
विराट आरसीबीच्या गाण्यावर का संतापला?
खरं तर, स्टेडियमच्या साउंड सिस्टीमवर आरसीबी संघाचे गाणे खूप मोठ्या आवाजात वाजवले जात होते. यावेळी विराट कोहलीने नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला होता. मात्र, त्याला या गाण्याच्या आवाजाचा त्रास होत होता. तो लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. त्यामुळे कोहली संतापला आणि त्याने ते थांबवण्यास सांगितले. विराट कोहलीच्या सांगण्यावरून साउंड सिस्टीम लगेच बंद करण्यात आले. यानंतर त्याने सराव केला. यावेळी त्याने काही स्ट्रेट ड्राईव्ह मारले. त्याच्या बॅटमधून काही पुल शॉट्सही दिसले.
हेही वाचा – RCB vs KKR : पावसाने केकेआरच्या प्लेऑफच्या आशेवर फेरलं पाणी! आरसीबीने गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान
विराट कोहलीची आयपीएल २०२५ मधील कामगिरी –
विराट कोहलीने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. यावेळी तो एका नवीन शैलीत दिसत आहे. त्याने या हंगामात ११ सामन्यांमध्ये ६३ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट १४३ होता. त्याच्या बॅटमधून ७ अर्धशतकेही आली. कोहलीने १८ षटकार आणि ४४ चौकार मारले आहेत. आरसीबीबद्दल बोलायचे तर १२ पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांचे २ सामने शिल्लक आहेत, त्यापैकी १ सामना जिंकल्यास ते प्लेऑफसाठी पात्र ठरेल.





