विराट-अनुष्काचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल; साधेपणाचे चाहत्यांकडून कौतुक

Virat Kohli and Anushka | टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. नुकताच दोघांचा लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने या वर्षी मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर मागील काही वर्षांपासून अनुष्का देखील सिनेसृष्टीपासून दूर आहे. यादरम्यान लंडनमध्ये दोघे कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे.
या व्हिडिओमध्ये विराट टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसत आहे आणि त्याच्या हातात पाण्याची बाटली आणि छत्री आहे. यावरून तो कदाचित जिम करून आला असावा किंवा काही सामान घेण्यासाठी बाहेर पडल्याचा अंदाज लावला जात आहे.
विराट-अनुष्का दोघे एकत्र असले तरी मुलं मात्र त्यांच्याबरोबर या व्हीडिओमध्ये नाहीत. विराट-अनुष्काबरोबर एक जोडप देखील आहे. ज्यांच्याबरोबर हे दोघेही रस्त्यात थांबून बोलताना दिसत आहेत. एका भारतीय चाहत्याने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. Virat Kohli and Anushka |
विराट-अनुष्काच्या साधेपणाचे नेहमीच कौतुक केले जाते. लाइमलाइटपासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दोघांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे देखील अनेकानी म्हंटले आहे. Virat Kohli and Anushka |
Virat Kohli And @AnushkaSharma Spotted Strolling Through The Streets Of London.💖
.
.
.
.#Virushka @imVkohli pic.twitter.com/ojWjndYE0r— virat_kohli_18_club (@KohliSensation) August 17, 2025
विराट कोहली आता आशिया चषक २०२५ नंतर होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे.
तर अनुष्का शर्मा शेवटची शाहरुख खानसोबत 2018मध्ये ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिचा कॅमिओ ‘क्वाला’ मध्ये दिसला. ती ‘चकदा एक्सप्रेस’ या बायोपिकमध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात होते. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसाठी सातत्याने अडचणी येत आहे. Virat Kohli and Anushka |
हेही वाचा :
ट्रम्प-पुतिन बैठकीमुळे सोन्याची चमक कमी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा भाव





