Virat Kohli Celebration : फायनलमध्ये शुबमन गिल स्वस्तात बाद होताच विराट कोहलीचा एकच जल्लोष, आक्रमक सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल
Virat Kohli Celebration : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात शुबमन गिलची बॅट अपयशी ठरली. विराट कोहलीने गिल बाद झाल्याचा जल्लोष मोठ्या आक्रमकपणे केला.

Virat Kohli Aggressive Celebration Shubman Gill Wicket : आरसीबीचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा मैदानावर कमालीच्या ऊर्जेसाठी आणि आक्रमकतेसाठी ओळखला जातो. विरोधी संघातील महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यावर कोहलीचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. रविवारी अहमदाबाद येथे आयपीएल २०२६ च्या महाअंतिम सामन्यातही असाच काहीसा थरार पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल बाद होताच विराट कोहलीने मैदानावर ज्या आक्रमकतेने सेलिब्रेशन केले, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
शुबमन गिलचा फायनलमध्ये स्वप्नभंग –
यंदाच्या संपूर्ण हंगामात जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुबमन गिलचे फायनलमध्ये मात्र सपशेल अपयश आले आणि त्याचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आरसीबीविरुद्धच्या खिताबी लढतीत गिल केवळ ८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १० धावाच करू शकला. डावातील तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने त्याला आपल्या जाळ्यात ओढले. हेझलवूडच्या दुसऱ्या चेंडूवर गिलने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला. यावेळी आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने मिड-ऑनवरून मिड-ऑफच्या दिशेने शानदार धाव घेत एक अप्रतिम झेल टिपला.
After Virat Kohli’s fiery celebration, Anushka Sharma was seen celebrating with equal excitement in the stands. 🔥❤️
Josh Hazlewood delivered a huge breakthrough by dismissing Shubman Gill, while Rajat Patidar pulled off a brilliant catch..!#RCBvsGT pic.twitter.com/joAYPiJaE4
— Faruk (@uf2151593) May 31, 2026
2️⃣ massive wickets. 1️⃣ dream start! 💥
What a start for #RCB in Ahmedabad 🔥
Updates ▶️ https://t.co/Yz6K3q6w0X#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT | @RCBTweets pic.twitter.com/loIvgOBVc4
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
गिल बाद होताच विराट कोहलीने आनंदाने हवेत उड्या मारत आक्रमक जल्लोष सुरू केला. गिल जर खेळपट्टीवर जास्त वेळ टिकला असता, तर तो आरसीबीसाठी डोकेदुखी ठरू शकला असता, याची पूर्ण जाणीव कोहलीला होती. गतविजेता आरसीबी संघ सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज दिसतो आहे. शुबमन गिलने आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ४५.७५ च्या सरासरीने तब्बल ७३२ धावा कुटल्या, ज्यात एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तो यंदाच्या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात, गुजरातने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १५५ धावा केल्या. त्यांच्यासाठी वॉशिंग्टन सुंदरने ३७ चेंडूंमध्ये ५० धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान, आरसीबीकडून रसिक सलामने तीन विकेट्स घेतले, तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. क्रृणाल पंड्यानेही एक विकेट्स घेतली.





