Virat Anushka Video : विराट-अनुष्काच्या नात्यात कटुता? व्हायरल VIDEO ने चर्चेला उधाण

Virat Anushka Viral Video Sparks Relationship Rumors : अवनीत कौर प्रकरणानंतर पहिल्यांदाच टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एकत्र दिसले. दोघेही बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र डिनर डेटवर जाताना दिसले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. ज्यामध्ये चाहत्यांना त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये सर्व काही ठीक वाटले नाही.
विराट-अनुष्कामध्ये बिनसलं का?
अलिकडेच, कोहलीला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवनीत कौरचा एक बोल्ड फोटो लाईक झाला होता, तेव्हापासून कौर देखील चर्चेत आहे. पण, यानंतर विराट कोहलीने लगेच एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करुन स्पष्टीकरण दिले होते. ज्यामध्ये लिहिले होते की, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे फीड साफ करताना, असे दिसते की अल्गोरिथमने चुकून एक परस्परसंवाद नोंदवला. यामागे कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो की कोणतेही अनावश्यक गृहीतके बांधू नका.’ आता चाहते व्हायरल व्हिडीओचा संदर्भ या पोस्टशी जोडत आहेत. त्यामुळे या व्हिडीओत नेमकं काय आहे? ते जाणून घेऊया.
Virat Kohli & @AnushkaSharma Seen At Lupa Restaurant In MG Road, Bengaluru.🤍
.
.
.#Virushka #RCB #IPL25 @imVkohli pic.twitter.com/8e7XcmesUO— virat_kohli_18_club (@KohliSensation) May 6, 2025
विराट-अनुष्काचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल –
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराटमधील केमिस्ट्रीमध्ये काहीतरी बिनसले असल्याचे दिसून येत आहे. विराट आधी गाडीतून खाली उतरतो आणि अनुष्काला उतरण्यासाठी मदत करायला हात पुढे करतो. यावेळी अनुष्का विराटचा हात धरण्यास नकार देते आणि गाडीतून उतरते आणि थेट रेस्टॉरंटमध्ये जाते. त्यानंतर विराचही तिच्या मागे जाताना दिसतो. यावरुन चाहते त्यांच्या नात्यात कटूता आल्याचा अंदाज बांधत असून कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
हेही वाचा – Varun Chakravarthy : वरुण चक्रवर्तीला ‘ती’ कृती नडली; बीसीसीआयने केली मोठी कारवाई, पाहा VIDEO
चाहत्यांच्या प्रतिक्रिया होतायत व्हायरल –
लगता है भाभी जी अभी भी इंस्टाग्राम लाइक वाले कांड के कारण गुस्सा है !! कोहली जी ने हाथ बढ़ाया अनुष्का ने इग्नोर कर दिया 🥲😹#ViratKohli pic.twitter.com/fp8lZeFVij
— Byomkesh (@byomkesbakshy) May 8, 2025
चाहत्यांनी विनोद केला की, विराटला अवनीत कौरचा फोटो आवडला म्हणून अनुष्का रागावली आहे. दुसऱ्या युजर्सनी लिहिले की, “मी काय पाहत आहे? तिने विराटचा हात धरला नाही.” तिसरा युजर्स म्हणाला की, ‘भाभी रागावली आहे.’ इतर टिप्पण्यांमध्ये ‘अवनीत कौरच्या घटनेनंतर भाभी संतापल्या आहेत.’ दरम्यान, त्यांच्या काही चाहत्यांनी हा व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती केली आहे, कारण त्यामुळे या जोडप्याबद्दल अनावश्यक अटकळ निर्माण होत आहे. पण, या जोडप्याने अधिकृतपणे त्यांच्यात कोणतेही मतभेद असल्याचे जाहीर केलेले नाही.





