Viral Video : जॅकी श्रॉफनी धुतल्या मंदिराच्या पायऱ्या; अभिनेत्याचा साधेपणा बघून नेटकरी म्हणाले…

Jackie Shroff : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांना 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आलंय. यानंतर जॅकी श्रॉफ यांनी आनंद व्यक्त केलाय. स्वतः जग्गू दादा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
जॅकी श्रॉफ हे सामाजिक कामे करताना नेहमीच दिसतात. अश्यातच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ हे मंदिराची साफसफाई करत असल्याचं दिसून येत आहे. जग्गू दादा हे चक्क मंदिराच्या पायऱ्या साफ करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या आजुबाजूला खूप लोक दिसत आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या मंदिराची साफसफाई जॅकी श्रॉफ करत आहेत, हे अजूनही कळू शकले नाहीये. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तसेच त्यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली आहे.
View this post on Instagram
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकरी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा भडीमार करत आहेत. एकाने लिहिले की, “खरोखरच जॅकी श्रॉफ यांना माहिती आहे की, एक रिअल हिरो नेमका कसा असतो ते’. दुसऱ्याने लिहिले की, ‘खरोखरच हे खूप जास्त मेहनती व्यक्ती आहेत’. अश्या अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिकमधील रामकुंड येथे जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. तसेच देशातील सर्वच मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून केले.





