Narendra Modi : लोकशाहीमध्ये हिंसाचाराला स्थान नाही.! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याबद्दल PM मोदींकडून चिंता
कोणत्याही लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. वॉशिंग्टन, डीसी येथील सुरक्षा व्यवस्था सक्षम आहे.

Narendra Modi – कोणत्याही लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. वॉशिंग्टन, डीसी येथील सुरक्षा व्यवस्था सक्षम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनालड ट्रम्प यांच्यावर गोळीबार होणे, अशा घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे.
ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स सुरक्षित आणि सुखरूप असल्याचेही समजते. ट्रम्प यांना उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही घटना वॉशिंग्टन, डी.सी. येथील व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान घडली. या घटनेदरम्यान, शस्त्र आणि चाकूने सज्ज असलेला एक माणूस हॉटेलच्या लॉबीमध्ये घुसला आणि बॉलरूमच्या दिशेने जाऊ लागला.
तिथे मोठ्या संख्येने अमेरिकन नेते आणि पत्रकार उपस्थित होते. संशयिताने पुढे जाण्याचा प्रयत्न करताच, सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.






