Vinod Tawde : विनोद तावडे प्रकरणावर निवडणुक अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

Vinod Tawde । Election Commission : मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) विरारमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशांच्या बॅगेसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मोठा गोंधळ तर झालाच पण बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली.
बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तर भाजपाच्याच नेत्यांनी विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटपासाठी येत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता अतिरीक्त मुख्य निवडणुक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी भाष्य करत या संदर्भातील माहिती दिली आहे. विनोद तावडे प्रकरण संदर्भात फ्लायींग स्कॉड घटनास्थळी पोहचले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे.
पोलिस अधिकारी या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करत आहे. उमेदवाराला 48 तासात त्या मतदारसंघात जाता येत नाही. त्यामुळे या संदर्भात ही चौकशी केली जाईल असेही डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले. माहीती मिळताच निवडणूक अधिकारी घटनास्थळी पोहचले असून नियमानुसार आता कारवाई केली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.





