विनोद पाटलांनी घेतली उदय सामंतांची भेट; जवळपास 3 तास रंगली चर्चा

छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर विनोद पाटील यांनी शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत दोघांची बैठक झाली. यावेळी विनोद पाटील यांनी उमेदवार बदलावा असं म्हणत तातडीचा सर्वे करून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विनोद पाटील हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेने इथे संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे.
फडणवीसांच्या भेटीनंतर बोलताना विनोद पाटील म्हणाले की, महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास मी ही जागा लढेन आणि नाही मिळाली तरीही ताकदीने जागा लढणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विनोद पाटील यांनी रात्री 9 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. दोघांमध्ये मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चर्चा झाली. या भेटीनंतर आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असून सकारात्मक चर्चा झाली आहे. माझे आणि विनोद पाटील यांचे 25 वर्षापासून घनिष्ठ संबंध आहे.
आमच्या दोघांची चर्चा झाली ती मी मुख्यमंत्र्यांना सांगेन आणि त्यावर मुख्यमंत्री चर्चा करेल मुख्यमंत्री उद्या बुलढाणा जाण्यासाठी संभाजीनगर वरून जाणार आहे त्यावेळेस विनोद पाटील यांची भेट घेतील. संपूर्ण चर्चा मुख्यमंत्री यांच्यासोबत बसून चर्चा करतो आणि त्यानंतर उद्या मुख्यमंत्री विनोद पाटील यांची भेट घेतील आणि मार्ग निघेल, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
विनोद पाटील लढण्यावर ठाम
तातडीचा सर्वे घेऊन मला उमेदवारी द्यावी आणि मोदींना मदत करणारा खासदार केंद्रात पाठवावा अशी मागणी मी उदय सामंत यांच्याकडे केली आहे, असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. तर मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी त्यांना विनंती केली आहे की आपण उमेदवार बदलावा, उदय सामंत यांनी मला विनंती केली आहे,
की आमच्या उमेदवाराला मदत करावी मात्र, मी त्यांना अनेक ठिकाणी परिस्थितीचे भान ठेवून बदल केले त्यानुसार इथे तातडीचा सर्वे करून मला सर्वसामान्य लोकांची पसंती नसेल, तर यावर आपण चर्चा करू असे सांगितल्याचे विनोद पाटलांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवारीबाबत पुनर्विचार होईल
फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची संभाजीनगर लोकसभेसाठी मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. परंतु महायुतीमधील दोन आमदार आणि एका राज्यसभा सदस्याने माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला. संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णयाचा पुनर्विचार होईल, अशी आपणास अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.





