बहीण बबिता फोगट म्हणाली,’कोणतेही षडयंत्र नाही, 200 ग्रॅम जास्त वजनामुळे मला सुद्धा अपात्र ठरवण्यात आले होते’

Vinesh Phogat । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन जास्त असल्याने अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या निर्णयानंतर काका महावीर फोगट यांनी विनेशला हा निर्णय मागे घेण्यास सांगितले होते आणि आता तिची बहीण बबिता फोगट यांनीही या निर्णयामुळे आम्हाला दु:ख झाल्याचे सांगितले.
बबिता फोगटने सांगितले की, ‘विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. केवळ मी आणि माझे कुटुंबच नाही तर संपूर्ण देश याने दु:खी आहे. आम्ही विनेशला धीर देऊ की आम्ही सगळे तिच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही तिच्याशी बोलून तिला पुन्हा मैदानात आणू आणि 2028 ऑलिम्पिक खेळण्यासाठी धैर्य देऊ.’
Vinesh Phogat । विनेशसोबत कट रचल्याच्या आरोपांवर बबिता म्हणाली…
विनेशसोबत कोणताही कट नसल्याचं बबिता म्हणाली. 2012 मध्ये, मी स्वतः 200 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र झाले. आणि आशियाई चॅम्पियनशिप खेळू शकले नाही. यापूर्वीही अनेक खेळाडू जास्त वजनामुळे स्पर्धेबाहेर पडले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही.
विनेशला राज्यसभेची उमेदवारी देण्याच्या भूपेंद्र हुड्डा यांच्या वक्तव्यावर बबिता फोगट म्हणाल्या की, ‘मी हुड्डाजींना सांगू इच्छिते की, तुम्ही तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किती खेळाडूंना राज्यसभेवर पाठवले? मी भूपेंद्र हुडा आणि दीपेंद्र हुडा या दोघांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे कुटुंब तोडणे थांबवा. कुटुंबाचे राजकारण करू नका. राजकारण करायचे असेल तर मैदानात जाऊन करा, हे कुटुंब तोडून राजकारण करू नका.’
Vinesh Phogat । विनेशवर काय म्हणाले योगेश्वर दत्त?
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त म्हणाले, ‘विनेश फोगटच्या अपात्रतेमुळे देशाचे नुकसान झाले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे विनेशला सर्वात जास्त दुखापत झाली आहे. हे दुःख तिच्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. विनेशने निवृत्ती घेऊ नये. तिने देशासाठी खेळले पाहिजे. ती खेळू शकते. तिने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
Vinesh Phogat । वजन वाढण्यावरून वाद झाला का?
100 ग्रॅम वजनामुळे विनाश फोगटला बुधवारी पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात बुधवारी विनेशचे वजन तिच्या निर्धारित ५० किलोच्या श्रेणीपेक्षा केवळ १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले.
मंगळवारी सकाळी विनेश फोगटचे वजन मोजण्यात आले तेव्हा तिचे वजन 49.90 किलो होते, जे 50 किलो गटासाठी योग्य होते. रिपोर्ट्सनुसार, सेमीफायनल मॅच खेळल्यानंतर तिला एनर्जीसाठी अन्न दिले गेले, ज्यामुळे तिचे वजन 52.700 किलो झाले.
यानंतर तिच्या वैद्यकीय पथकाने रात्रभर विनेशचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. तिला रात्रभर व्यायाम करायला लावला. तिने रात्रभर स्किपिंग आणि सायकलिंग केले. सौना बाथही घेतले. अगदी नखे कापली. विनेशचे वजन कमी झाले, परंतु सर्व प्रयत्न करूनही ते 50.100 किलोवर अडकले.





