विनेश फोगटच्या अपात्रतेवर अखिलेश यादव म्हणाले,’सखोल चौकशी करा ‘सत्य’ समोर आले पाहिजे…’

Vinesh Phogat । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. तर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विनेशच्या अपात्रतेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चेचे तांत्रिक कारण तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ये विनेश का नही देश का अपमान है, @Phogat_Vinesh पूरी दुनिया में इतिहास रचने जा रही थी, उनको 100 ग्राम ओवरवेट दिखाकर अयोग्य घोषित करना घोर अन्याय है। पूरा देश विनेश के साथ खड़ा है, भारत सरकार तुरंत हस्तक्षेप करे, अगर बात ना मानी जाए तो ओलंपिक का बहिष्कार करे।#Phogat_Vinesh…
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) August 7, 2024
समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली यासोबतच यामागचे कारणही उघड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान,भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केली आहे. त्यांनी लिहिले, “हा विनेशचा नाही तर देशाचा अपमान आहे. विनेश फोगट संपूर्ण जगात इतिहास घडवणार होती, तिचे वजन 100 ग्रॅम जास्त दाखवून तिला अपात्र ठरवणे हा घोर अन्याय आहे. संपूर्ण देश विनेश, सरकारच्या पाठीशी उभा आहे. भारताने ताबडतोब हस्तक्षेप करावा, जर तुम्ही सहमत नसाल तर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाका.”





