Paris Olympics 2024 : सचिन तेंडुलकर विनेश फोगटच्या समर्थनार्थ आला पुढे, म्हणाला “अंतिम फेरीपूर्वीच….”

Paris Olympics 2024 (Vinesh Phogat disqualified) :- भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले होते. विनेशने अंतिम फेरी गाठून देशासाठी रौप्य पदक निश्चित केले होते, पण तिचे लक्ष्य सुवर्णपदक जिंकण्याचे होते. मात्र, सामन्यापूर्वी तिला अपात्र घोषित करण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेश हिने क्रीडा न्यायालयात धाव घेतली आहे.
#VineshPhogat #Paris2024 #Olympics @WeAreTeamIndia pic.twitter.com/LKL4mFlLQq
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 9, 2024
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जास्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरलेल्या विनेश फोगटचे समर्थन केले आहे. तेंडुलकरने शुक्रवारी एका इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले, ‘प्रत्येक खेळाचे स्वतःचे नियम असतात, जे वेगवेगळ्या संदर्भात पाहिले जातात. वेळोवेळी नियम बदलणे आवश्यक आहे. विनेशने फायनलपर्यंत मजल मारली. तिची अपात्रता अंतिम फेरीपूर्वीच झाली होती आणि त्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले पाहिजे.”
पुढे तो म्हणाला की, “पदक न मिळणे हे तर्कशास्त्र आणि खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे. जर एखाद्या खेळाडूने ड्रग्ज घेऊन कामगिरी केली तर ते नियमांच्या विरोधात आहे. या प्रकरणात अपात्रता समजण्यासारखी आहे, परंतु विनेशने योग्य पद्धतीने टॉप-2 गाठले आहे. तिला नक्कीच रौप्य मिळाले पाहिजे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. आशा आहे की विनेशला तिला योग्य तो सन्मान मिळेल” असेही तेंडुलकरने म्हटले आहे.





