Paris Olympics 2024 (Wrestling) : भारताला मोठा धक्का..! विनेश अंतिम फेरीपूर्वी ठरली अपात्र, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळणार नाही पदक, जाणून घ्या कारण….

Vinesh Phogat Disqualified । करोडों भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. याचा स्पष्ट अर्थ विनेश फोगट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही.
संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि ती आज रात्री उशिरा तिचा सुवर्णपदकासाठीचा सामना खेळणार होती, पण आता तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरवण्यात आले ते जाणून घेऊया….
विनेश फोगट हिला 50 किलो वजनी गटात अपात्र ठरवण्यात आले आहे. तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे.
विनेशला आज रात्री उशिरा अंतिम सामना खेळायचा होता. मात्र विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता तिला आजचा अंतिम सामना खेळता येणार नाही. या निर्णयाला भारताने तीव्र विरोध दर्शवला आहे.
नियमानुसार अपात्र ठरल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. याचा अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावे लागणार आहे. अंतिम फेरीत पोहोचूनही सुवर्णपदक सोडा, आता विनेश फोगटला रौप्य आणि कांस्यपदकही गमवावे लागले आहे.





