“विनेश हिम्मत हारणारी नाही…”; राहुल गांधींची भावूक पोस्ट

Vinesh Phogat Disqualified | स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तिने अंतिम फेरी गाठली होती, पण आता ती पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली आहे. आता विनेश फोगाट आज ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेऊ शकणार नाही. यानंतर आता अनेक दिग्गज मंडळींच्या भावूक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विनेश फोगटसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधींनी ट्वीट करत लिहिले की, “विश्वविजेत्या कुस्तीपटूंना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताची शान विनेश फोगाटला काही कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत हारणारी नाही, त्या आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तुम्ही नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुमची ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे,” असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
विश्वविजेता पहलवानों को हरा कर फाइनल में पहुंची भारत की शान विनेश फोगाट का तकनीकी आधार पर अयोग्य घोषित किया जाना दुर्भाग्यपूर्ण है।
हमें पूरी उम्मीद है कि भारतीय ओलंपिक संघ इस निर्णय को मजबूती से चैलेंज कर देश की बेटी को न्याय दिलाएगा।
विनेश हिम्मत हारने वालों में से नहीं हैं,…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट Vinesh Phogat Disqualified |
“विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. पण मला माहित आहे की आव्हानांना सामोरे जाणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही मजबूतीने कमबॅक करताल, आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विनेश फोगाट रुग्णालयात दाखल Vinesh Phogat Disqualified |
दरम्यान, विनेश फोगट हिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विनेश फोगटची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलय.डिहायड्रेशनमुळे विनेश फोगटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाही तर स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्या प्रकृतीविषयी अद्याप तरी कोणतीही गंभीर बाब नसल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच तिला लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा:
जयंत पाटलांचा मोदींवरच निशाणा,’युक्रेन-रशिया युद्ध रोखलं, मग विनेशबाबत घडलं तेही रोखायला हवं’





