Santosh Deshmukh Case | मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा

Santosh Deshmukh Case | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेला 2 महिने उलटून गेले तरीही अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ उद्यापासून आंदोलन करणार आहेत.
कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी या ग्रामस्थांनी ‘करो या मरो’चा इशारा दिला आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि सर्व गटातील लोकांसह महिलाही या आंदोलनात सामील होणार आहेत. दोन दिवस अन्न त्याग आंदोलन केलं जाईल. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, “गावकऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यात सर्वानुमते अन्न त्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात ८ ते ९ मागण्या असून उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, कृष्णा आंधळेला अटक, अशा मागण्या आहेत. त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी असणार आहे. या अन्न त्याग आंदोलनात गावकरी साखळी पद्धतीने सहभागी होतील. या ठिकाणी जितक्या लोकांची व्यवस्था असेल, तितके लोक पहिल्या दिवशी बसतील. याचं नियोजन संध्याकाळी गावकरी करणार आहेत.” Santosh Deshmukh Case |
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेवरुन राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. Santosh Deshmukh Case |
हेही वाचा :





